महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्यामुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले: प्रकाश शेंडगे

| Updated on: May 27, 2021 | 3:47 PM

पदोन्नती रोखण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मागासवर्गीयच नव्हे तर धनगर आणि ओबीसी समाजालाही बसेल | Prakash Shendge

महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्यामुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले: प्रकाश शेंडगे
प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते
Follow us on

मुंबई: महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. या निर्णयासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मतही शेंडगे यांनी व्यक्त केले. (OBC leader Prakash Shendge on cancellation of reservation in promotion)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी पदोन्नतीसंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले. पदोन्नती रोखण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मागासवर्गीयच नव्हे तर धनगर आणि ओबीसी समाजालाही बसेल, असे शेंडगे यांनी म्हटले. मागासवर्गियांची पदोन्नती रोखण्याचा निर्णय कुठलीही कॅबिनेट बैठक न करता घेण्यात आला. हे साफ चुकीचं आहे. महाविकासआघाडीतील एका नेत्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा जीआर काढण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईल: नितीन राऊत

‘संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेचं स्वागत’

मराठ्यांच्या आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, या संभाजी राजे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण आजही अनेक मराठा नेते हे ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. हे योग्य नाही. याचा ओबीसी समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध करतो, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

पदोन्नतीतील आरक्षणासाठी नितीन राऊत आक्रमक, सरकारला धोका आहे का? राऊत म्हणतात….

‘पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या’, माजी सामाजिक न्यायमंत्र्यांचा सरकारला इशारा

अजित पवारांना प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं : गोपीचंद पडळकर

(OBC leader Prakash Shendge on cancellation of reservation in promotion)