मुंबईकर सुखावला; मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जण ठार

| Updated on: Jun 09, 2022 | 8:42 PM

हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते की, 31 मे ते 7 जून या काळात मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील काही भागात पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मुंबईकर सुखावला; मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जण ठार
हलक्याशा पावसाची सुरुवात
Follow us on

मुंबई: आज राज्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार आगमन केले आहे. त्याबरोबरच हवामान खात्याच्या (Weather Dapartment) माहितीनुसार मान्सून येत्या चोवीस तासात राज्यातील विविध जिल्ह्यात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर काही वेळातच मुंबई उपनगरातही मान्सून पूर्व (Pre Monsoon) पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाने (Mumabi Rain) ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावल्याने मुंबईकर आता या पावसामुळे सुखावले आहेत.

मुंबईसह उपनगरातही हजेरी

मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी वातावरणात प्रचंड उष्णता वाढली होती, आज झालेल्या पावसामुळे मात्र आता नागरिकांना गारवा मिळाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील विविध भागात पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मात्र वादळी पावसामुळे घराच्या तीन भिंती कोसळून एकाच घरातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

 

मान्सूनच्या वाटचालीस विलंब नाही

हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते की, 31 मे ते 7 जून या काळात मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील काही भागात पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले होते. आयएमडीच्या शास्रज्ञांच्या मते मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नसून येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबईत पाऊस राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पुढच्या 48 तासांत मान्सून राज्यात

आम्हाला खात्री आहे की पुढच्या 48 तासांत मान्सून राज्यात दाखल होणार आहे. राज्यात मान्सून वारे वाहत असल्याने पावसाला आता पोषक वातावरण असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मान्सून पूर्व पावसाने कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात 60 किमी वेगापर्यंतचे वादळी वारे

अरबी समुद्रात 60 किमी वेगापर्यंतचे वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आल्याने 8 ते 10 जून या कालावधीत समुद्रात मासेमारीस जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी

राज्यात भंडारा, अहमदनगर, जळगाव, नाशिक, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे दुर्देवी घटना घडली आहे. तर संगमनेर तालुक्यात झाड कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.