पुण्यातील ‘शौकीन’चा ‘तांबूल विडा’ आता मुंबईतही रंगणार, शर्मिला ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

| Updated on: Aug 17, 2021 | 4:05 PM

‘शौकीन’ हा ब्रँड आता खास मुंबईकरांसाठी दादर पश्चिमेच्या रानडे रोड या उच्च- मध्यम वस्तीमध्ये आजपासून सुरु झाला आहे. दादरच्या ‘शौकीन’चे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यातील शौकीनचा तांबूल विडा आता मुंबईतही रंगणार, शर्मिला ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
Follow us on

मुंबई : ‘कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… ‘ हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नातं आहे. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य शौकिनांचंही आवडतं आहे. तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचं हे पान इंग्रजीमध्ये बीटल लीफ, तेलुगूमध्ये तमालपाकु तर मराठीत याला तांबूल असं म्हटलं जातं. जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत सामान्य ‘शौकीन’ तरुणाईसुद्धा आजही पान खाणं मस्ट म्हणते. अश्या खास ‘शौकिन’ मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता हे ‘शौकीन’ पान सहज- मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध होत आहे. (Shaukeen the complete paan shop started in dadar Mumbai, Inauguration by Sharmila Thackeray)

आयुष्यात एकदाही पान खाल्ले नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पान आणि सुपारीने भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील सांकृतिक, सामाजिक भावविश्व एवढे व्यापले आहे की, त्याशिवाय सर्व सामाजिक व्यवहार बेरंग होवून जातील. पान खाणे हे शौकीन भारतीयांचे प्रमुख वैशिष्ट्य! अल्पावधीतच राज्यात विशेष लोकप्रिय झालेला ‘शौकीन’ हा ब्रँड आता खास मुंबईकरांसाठी दादर पश्चिमेच्या रानडे रोड या उच्च- मध्यम वस्तीमध्ये आजपासून सुरु झाला आहे. दादरच्या ‘शौकीन’चे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या रिटा गुप्ता, निर्माते – दिग्दर्शक – अभिनेते अजित भुरे, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने, विनय येडेकर, अतुल परचुरे, सखी परचुरे, अजीत रमेश तेंडुलकर, बीवायपीचे श्रीराम पाध्ये, दिग्दर्शक अजय फणसेकर, केतकर ज्वेलर्सचे धनंजय केतकर, माजी नगरसेवक अश्विन शहा इत्यादी पान शौकीन मान्यवर उपस्थित होते.

पुण्यामधील एका ‘शौकीन’ अवलियाने 2005 साली अस्सल चवीच्या पुणेकरांसाठी पाहिलं ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले. शरद मोरे या ध्येयवेड्या माणसाने सर्वोत्कृष्ट अणि अत्यंत दर्जेदार तंबाखूरहित पानांचा स्वाद खऱ्या पानरसिकांच्या परिवारापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलून हे ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले. हजारो वर्षांची शाही परंपरा असलेल्या भारतीय पान संस्कृतीचा वारसा आणि स्वाद आपल्यासारख्या पान रसिकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय उराशी बाळगत त्यांनी आपला ‘शौकीन’ हा ब्रँड तयार करीत महाराष्ट्रातील पुणे, पंढरपूर, शिर्डी, खारघर असा विस्तार केल्यानंतर आता ते मुंबईत शिरकाव करीत आहेत. दादरमधील प्रसिद्ध सोन्याचांदीचे व्यापारी केतकर बंधूंना या ध्येयवेड्या ‘शौकीनाने’ मुंबईकरांसाठी हा विडा उचलण्यास भाग पाडले आहे.

इतर बातम्या

लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम; वाचा कारण काय?

मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही, कारण…

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, जातीय राजकारणावरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

(Shaukeen the complete paan shop started in dadar Mumbai, Inauguration by Sharmila Thackeray)