नियुक्तीसाठी मराठा तरुणांचं धरणे आंदोलन, सुप्रिया सुळे आझाद मैदानावर

| Updated on: Feb 03, 2020 | 2:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (3 जानेवारी) आझाद मैदान येथे जाऊन आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली (Supriya Sule meet Maratha Protesters).

नियुक्तीसाठी मराठा तरुणांचं धरणे आंदोलन, सुप्रिया सुळे आझाद मैदानावर
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (3 जानेवारी) आझाद मैदान येथे जाऊन आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली (Supriya Sule meet Maratha Protesters). हे तरुण मागील अनेक दिवसांपासून निवड होऊनही कामावर नियुक्ती न झाल्याने धरणे आंदोलन करत आहेत. सुप्रिया सुळे यांनी या सर्व आंदोलनकाऱ्यांची बाजू समजून घेतली (Supriya Sule meet Maratha Protesters). तसेच सायंकाळी साडेचार वाजता बैठक घेणार असल्याची माहिती दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी संसदेत असल्याने मला या आंदोलनाची कल्पना नव्हती. मात्र माध्यमांमधून मला याची माहिती मिळाली. त्यामुळे दिल्लीहून परत आल्यावर मी त्यांना भेटायला आले. आंदोलकांनी त्यांच्या प्रश्नाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्यासह याविषयावरील सरकारचे वकील यांची आज सायंकाळी साडेचार वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही बाजू ऐकून यावर मार्ग काढण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहिल.”


“दिल्लीतील परिस्थिती अतिशय चिंताजनक”

दिल्लीत आता खरंच भीती वाटते. ज्यावेळी जबाबदार व्यक्ती गोळ्या झाडण्याची भाषा करते आणि दिल्लीत गोळीबार होतो. म्हणून मी दिल्लीत हेल्मेट घालून आणि जॅकेट घालून दिल्लीत फिरत असल्याचं मत मुंबई कलेक्टिव्ह कार्यक्रमात व्यक्त केलं. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीची वेगळी ओळख आहे. त्या दिल्लीत आज गोळीबाराच्या घटना होत असतील, तर ते अतिशय चिंताजनक आहे. तेथे असं घडत असल्यानं मला अस्वस्थ वाटत आहे, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ :