School Reopen | वसई-विरार परिसरातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग 27 पासून सुरू

| Updated on: Jan 21, 2022 | 7:04 PM

वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आठवी ते बारावी पर्यंतच्या 27 जानेवारी पासून होणार सुरु होणार आहेच. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा मात्र पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाबरोबर पालघर जिल्हाधिकार आणि वसई-विरार शहर महानगरपालिक आयुक्त यांच्योसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक शाळा मात्र बंदच राहणार आहेत.

School Reopen | वसई-विरार परिसरातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग 27 पासून सुरू
School Reopen
Follow us on

वसई-विरारः वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आठवी ते बारावी पर्यंतच्या (Reopen) 27 जानेवारी पासून होणार सुरु होणार आहेच. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (school) मात्र पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाबरोबर पालघर जिल्हाधिकार आणि वसई-विरार शहर महानगरपालिक (Corporation )आयुक्त यांच्यामध्ये चर्चा होऊन आज निर्णय घेण्यात आला. वसई-विरार शहर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची एकूण 3 लाख 94 हजार 289 इतकी आहे. यामध्ये प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 120 शाळा आहेत. त्यामध्ये चार वरिष्ठ महाविद्यालये,  36 कनिष्ठ महाविद्यालये, सात दिव्यांग शाळा, 752 खासगा शाळा कार्यरत आहेत. तर या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असून या परिसरातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 3 लाख 94 हजार 289 एवढी आहे. यापैकी आठवी ते बारावीपर्यंतची विद्यार्थ्यांसंख्या 1 लाख 29 हजार 937 तर पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 64 हजार 342 एवढी आहे.

आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास शासनाकडून सांगितले असले तरी अजूनही नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीही आज विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

कोविडचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर शासनाच्या नियमानुसार सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर व कोविडची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी वसतिगृहे सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.

सातवीपर्यंतच्या शाळां बंदच

आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा जरी सुरु होणार असल्यातरी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार नाहीत. शासनाकडून पुढील आदेश येत नाही तोपर्यंत सातवीपर्यंतच्या शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे विद्यार्थ्यांची आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

संबंधित बातम्या