AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Assembly Election : पणजीतूनच अपक्ष म्हणून लढणार, उत्पल पर्रिकरांची घोषणा; उत्पल यांची एकला चलोची भूमिका भाजपला नडणार?

माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे, अशी घोषणा उत्पल पर्रिकर यांनी केलीय.

Goa Assembly Election : पणजीतूनच अपक्ष म्हणून लढणार, उत्पल पर्रिकरांची घोषणा; उत्पल यांची एकला चलोची भूमिका भाजपला नडणार?
उत्पल पर्रीकर
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 6:49 PM
Share

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळीत मोठी घडामोड आज पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार असल्याची घोषणा केलीय. ‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत (Panaji) मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी मोठी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केलीय.

‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले. ‘गेल्यावेळीही मला संधी नाकारली आहे. आताही नाकारले आहे. इथल्या लोकांना माहीत आहे. हा मनोहर पर्रिकराच्या पार्टीतील निर्णय वाटत नाही. कधी तरी जनतेसाठी थांबावं लागतं. मी अपक्ष लढतोय. माझं राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवलं आहे. मी कोणत्याही पद आणि मंत्रीपदासाठी मी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे. हे युद्ध कठीण आहे. मला काही तरी मला मिळेल यासाठी मी काही करत नाही. पणजीचे लोक 30 वर्ष माझ्या लोकांसोबत होते. येथील वर्ग उच्च शिक्षित आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे. माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही’, अशी खंतही यावेळी उत्पल यांनी व्यक्त केलीय.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून मन वळवण्याचा प्रयत्न

तप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्पल पर्रीकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण उत्पल हे पणजीतुन निवडणूक लढवण्यावर ठाम. दोन दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे राज्यात पडसाद उमटले होते. 12 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून उत्पल यांना उमेदवारी दिली पाहिजे, असं म्हणणं पूर्णपणे चूक असल्याचं म्हटलं. पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीच, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

उत्पल पर्रीकर यांचा फडणवीसांना सवाल

पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

इतर बातम्या :

School Reopen : कोरोनाकाळात सोमवारपासून शाळा सुरू, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्लॅन काय? शिक्षणमंत्री म्हणतात…

‘गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ, डिपॉझिट जरी वाचले तरी…’,आशिष शेलारांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....