Sanjay Raut : मराठी विजयी मेळाव्याच्या यशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
"राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकलं. संवाद पाहिजे राजकारणात. जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला"
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Jul 5, 2025
- 2:34 pm
मोठी बातमी! मनसेकडून उद्धव ठाकरेंना आंदोलनात सहभागी होण्याचा प्रस्ताव? मराठीच्या मुद्द्यावर एकाच मोर्चाचा आग्रह
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला आहे. हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको, असा मनसेचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Jun 26, 2025
- 5:56 pm
पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर खून प्रकरणात अमित शाह होते आरोपी; देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा संजय राऊतांचा गौप्यस्फोट
'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली, असा दावा राऊतांनी केला आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: May 16, 2025
- 9:42 am
IND vs ENG : ‘पडद्याच्या पुढे एक राजकारण आणि पडद्याच्या मागे…’, वानखेडे स्टेडियमवरचा हा PHOTO बघा
IND vs ENG : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप नेते कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, आदिती तटकरे, नमिता मुंदडा, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम असे सर्व पक्षीय राजकारणी या सामन्याला उपस्थित होते.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Feb 3, 2025
- 1:24 pm
मोठी बातमी : मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी ठाकरे गट जागा सोडणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेकडून तशी चाचपणी देखील सुरु आहे. आता माहिती अशी आहे की जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर त्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही. काय आहे बातमी सविस्तर पाहा
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Oct 19, 2024
- 5:28 pm
महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढणार? मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित, कोण किती जागा लढणार?
महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Oct 2, 2024
- 8:44 pm
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरले असताना महाविकासआघाडीत बैठकांचा सिलसिला वाढला आहे. विधानसभेसाठी जास्त जागा असल्याने चर्चेसाठी वेळ लागतो. लवकरच यादी जाहीर केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत ही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Sep 21, 2024
- 3:33 pm
महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? ठाकरे, पवार की काँग्रेस कोणाला मिळणार किती जागा?
सध्या सर्वच पक्षांकडून जागावाटप, मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Sep 14, 2024
- 12:39 pm
नेहरुंनी ही माफी मागितली होती, तर मोदी कोण – संजय राऊत
महाविकासआघाडी मुंबईत उद्या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. पण अद्याप या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. संजय राऊत म्हणाले की, यामध्ये परवानगीचा विषयच नाही. भावना व्यक्त करायला परवानगी कशाला हवी असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Aug 31, 2024
- 5:30 pm
महाविकास आघाडीच्या बैठकीतील सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाचा मुंबईतील 20 जागांवर दावा
महाविकास आघाडीच्या नेत्यांची वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे गटाने मोठा बॉम्ब टाकल्याचं कळतं. ठाकरे गटाने मुंबईतील सर्वाधिक जागा मागितल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Aug 24, 2024
- 6:18 pm
‘उद्धव ठाकरेच आमचा चेहरा, सिनेमात खलनायक विरोधात एक हिरो लागतो’
"महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आहेत. कॉंग्रेस पक्षाचं नेतृत्व एक नाही, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे अनेक नेते आहेत. काही माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे चेहरा असेल तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे", असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Aug 15, 2024
- 10:00 pm
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची 10 दिवसात 2 वेळा भेट, ठाकरे गटात चिंता, सूत्रांकडून मोठी बातमी
राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जागा वाटपासाठी रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या 10 दिवसांत 2 वेळा भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटात आश्चर्य व्यक्त केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Aug 4, 2024
- 7:40 pm