AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकात आता ते कोणते खुलासे करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले
Sanjay Raut's new book to be published soon.
| Updated on: Sep 17, 2026 | 4:48 PM
Share

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक येत असल्याची घोषणा त्यांनी एक्स माध्यमातून केली आहे. त्यांनी आधी ‘नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी आर्थररोड कारागृहातील आपले अनुभव कथन केले आहेत. या नव्या पुस्तकात नेमके आता संजय राऊत कोणते धक्कादायक खुलासे करता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या पुस्तकाचे कव्हर पेज संजय राऊत यांनी एक्स माध्यमावर झळकवले आहे.

येथे पोस्ट वाचा –

संजय राऊत यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांनी याआधी गुन्हेगारी विश्व, तसेच त्यांच्या दैनिक सामनातील लोकप्रिय सदरं रोखठोक, सच्चाई तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘फटकारे , एकवचनी (भाग १ आणि २), युगान्त, चेक मेट, हेप्सीचे वादळ, सुन्न करणारे दिवस, अशी अनेक पुस्तके याआधी आली आहेत. मात्र, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थर रोड कारागृहात काढलेल्या १०४ दिवसांच्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेले ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांचे पुस्तक जास्त गाजले होते. आता त्यांचे नवीन पुस्तक ‘बोध किर्तन’ काय  खळबळ माजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांचे तुरुंगातील दिवसांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले होते. त्यावेळी राजकारणात खळबळ उडाली होती. ईडी चौकशीचा ससेमिरा लागूनही राऊत यांनी न झुकता तुरुंगात जाणे पसंद केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये या पुस्तकाबद्दल अधिकच आत्मियता होती. या पुस्तकावर आधारित एक मुलाखत मध्यंतरी वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर घेतली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी तुरुंगात त्यांना घरातील जेवणाची जेव्हा परवानगी मिळाली त्यावेळचा अनुभव सांगितला आहे. हा डब्बा सतरा वेळा तपासला जात होता. त्यात त्यांच्या आईने सणाच्या दिवशी दोन लाडू पाठवले होते. ते लाडू देखील तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले होते असा अनुभव सांगितले होता. तसेच गुजरातचे गृहमंत्री अमित शाह यांना सोडवण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांकडे शिवसेना प्रमुखांनी शब्द टाकावा अशा केलेल्या विनंतीचाही गौप्यस्फोट केला होता.

Follow Us
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...