AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tiger: उद्धव सेनेचा मराठवाड्यातील तो नेता गळाला? हिंगोलीचे आष्टीकर मातोश्रीवर, पण त्या खासदाराची बैठकीला दांडी

Operation Tiger Shivsena: हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर पाटील हे मातोश्रीवर आज बैठकीला हजर झाले. पण मराठवाड्यातील या खासदाराने बैठकीला दांडी मारल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Operation Tiger: उद्धव सेनेचा मराठवाड्यातील तो नेता गळाला? हिंगोलीचे आष्टीकर मातोश्रीवर, पण त्या खासदाराची बैठकीला दांडी
उद्धव ठाकरे, नागेश आष्टीकर पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 22, 2026 | 3:06 PM
Share

Uddhav Thackeray – Eknath Shinde Shivsena: ठाकरे सेनेचे हिंगोलीतील खासदार नागेश आष्टीकर पाटील हे आज मातोश्रीवर दाखल झाले. यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चा झाली होती. तर आज विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठावाडा विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला खासदार आष्टीकर हजर झाले. पण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

मराठवाडा विभागाच्या बैठकीला हजेरी

मातोश्रीवर आज स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्शभूमीवर मराठवाडा विभागाच्या बैठकीच आयोजन करण्यात आले होते. नागेश आष्टीकर पाटील हे जिल्ह्यातील शिवसैनिकांसह या बैठकीला हजर राहिले. या बैठकीला नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाडा विभागात विधान परिषदेच्या चार जागा आहेत. चार आमदार येथून निवडून जाणार आहेत. या जागांबाबत रणनीती ठरवण्यासाठी आज मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे, आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव यांची दांडी

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या बैठकीकडे अपेक्षेप्रमाणे पाठ फिरवल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी यापूर्वी एका सभेत मोठे संकेत दिले होते. मी पक्षासोबत प्रामाणिक आहे. परंतु शेवटी राजकीय परिस्थिती काय निर्माण होईल. ते उद्याचे आज सांगू शकत नाही, असे वक्तव्य खासदार संजय जाधव यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. आज मातोश्रीवरील मराठवाडा विभागाच्या बैठकीला खासदार बंडू जाधव यांनी दांडी मारल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमच्या मनात काहीच नाही

तर बैठकीनंतर खासदार आष्टीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बैठकीतील काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. तर ऑपरेशन टायगर नाही ते स्लो ऑपरेशन टायगर असे म्हणायला हवे अशी प्रतिक्रिया दिली. गेल्या दोन वर्षांपासून ऑपेरशन टायगरची केवळ चर्चा सुरू आहे. आमच्या कुणाच्याही मनात काहीच नाही असे खासदार नागरे आष्टीकर पाटील म्हणाले. तर या चर्चांना पूर्णविराम देण्याची मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटलो पण त्यांनीही कधी हा विषय काढला नाही असे आष्टीकर म्हणाले. या केवळ माध्यमातील चर्चा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल