AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीचे दिग्गज एकत्र, शरद पवारांशी बंद दाराआड ४० मिनिटं चर्चा! डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पवार कोणता पत्ता उघडणार?

मुंबईत इंडिया आघाडीचे दिग्गज एकत्र आले. त्यांची शरद पवारांशी बंद दाराआड ४० मिनिटं चर्चा झाली. आता डिलिमिटेशनवरील बैठकीनंतर पवार अधिवेशनात कोणता पत्ता उघडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

इंडिया आघाडीचे दिग्गज एकत्र, शरद पवारांशी बंद दाराआड ४० मिनिटं चर्चा! डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पवार कोणता पत्ता उघडणार?
sharad pawar news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 10:42 PM
Share

संसदेच्या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक पाडण्यासाठी इंडिया आघाडींच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. इंडियाचे आघाडीचे नेते दुपारी चेन्नईत पोहोचले. चेन्नईत त्यांनी एम के स्टॅलिन यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री मुंबईत शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या नेत्यांना बैठकीत नेमकं काय घडलं, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु आता अधिवेशनात शरद पवार हे कोणता पत्ता उघडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागणार आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांची चेन्नईत बैठक झाली. परंतु एम के स्टॅलिन यांची मनधरणी करण्यास अपयश आलं. त्यानंतर सर्व नेते मुंबईत पोहोचले. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत बैठक केली. शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. ब्रीच कँडी रुग्णालयात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांसोबत ४० मिनिटांच्या चर्चेनंतर इंडिया आघाडीचे नेते विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. बैठकीनंतरही शरद पवारांच्या भूमिकेबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शरद पवार डिलिमिटेशन विधेयकावर काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवार नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या भूमिकेनंतर इंडिया आघाडीच्या पुढील रणनीतीबाबत उत्सुकता लागली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार राहणार अनुपस्थित 

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आयोजित अधिवेशनात शरद पवार यांच्या पक्षाचे दोन खासदार प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव अनुपस्थित राहणार आहेत. यात स्वतः शरद पवार हे आजारी असल्यामुळे संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेही अनुपस्थित राहणार आहेत. सुरेश म्हात्रे हे आजारी असल्यानं अधिवेशनाला अनुपस्थितीत राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा