AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!

डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले… महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!

| Updated on: Nov 29, 2026 | 5:36 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी सीमांकन विधेयकाला दुर्घटनात्मक संबोधत तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हितासाठी या विधेयकाविरोधात मतदान करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सीमांकन प्रक्रियेमुळे महाराष्ट्राचे संसदीय प्रतिनिधित्व कमी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या मुद्यावर इंडिया आघाडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित सीमांकन विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी या प्रक्रियेला घटनात्मक नव्हे, तर दुर्घटनात्मक असे संबोधले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हितासाठी या विधेयकाविरोधात मतदान करावे, असे थेट आवाहन ठाकरे यांनी केले आहे. ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली की, सध्याच्या स्वरूपातील सीमांकन महाराष्ट्राच्या संसदीय प्रतिनिधित्वावर नकारात्मक परिणाम करेल.

उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राच्या लोकसभा जागांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली, ज्यामुळे राज्याचे महत्त्व कमी होईल. २०१८ मधील मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा दाखला देत, त्यांनी यापूर्वीही अशा पक्षपाती प्रयत्नांचा अनुभव आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सीमांकन केवळ घटनात्मक प्रक्रिया नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम होतील. सध्याची घडामोड देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असून, भविष्यात अश्रू ढाळण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी यावर त्वरित निर्णय घेण्याची आणि दोन दगडांवर पाय ठेवू नये, अशी त्यांची मागणी आहे.

Published on: Nov 29, 2026 05:36 PM

Follow Us