मोठी बातमी! सापाला दूध पाजलं तरी… पार्थ पवारांची खळबळजनक पोस्ट; टार्गेटवर नमकं कोण?
पार्थ पवार यांच्या एका पोस्टमधील मजकुराने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. 'साप' म्हणत त्यांनी नेमका कोणाला उद्देशून हा इशारा दिला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार पार्थ पवार यांच्या एका स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा सापच असतो, असा मजकुर पार्थ पवार यांनी स्टेटसला लावला आहे. तसेच अशा आशयाची इन्स्टाग्राम स्टोरीही त्यांनी लावली आहे. त्यामुळे या स्टेटसमधून नेमका कोणाला टोला लगावण्यात आला आहे, याची मोठी चर्चा रंगू लागली आहे. डसणारा साप म्हणून नेमका कोणाचा उल्लेख केला याची राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
