AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! महानगर गॅस पाईपलाईनला गळती, उंचच उंच गॅस उडाला, दादरमध्ये प्रचंड खळबळ

मुंबईतील दादरमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमरहिंद मंडळाजवळील महनगर गँसची पाईप लाईन लीक झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

मोठी बातमी ! महानगर गॅस पाईपलाईनला गळती, उंचच उंच गॅस उडाला, दादरमध्ये प्रचंड खळबळ
mahanagar gas pipeline LeakImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: May 29, 2026 | 8:23 PM
Share

मुंबईतील दादरमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमरहिंद मंडळाजवळील महनगर गँसची पाईप लाईन लीक झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या गॅस लीकमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोखले मार्गावरील वाहतूक पोलिसांनी अडवली

अमरहिंद मंडळाजवळील महनगर गँसची पाईपलाईन लीक झाल्यामुळे गोखले मार्गावरील वाहतूक पोलिसांनी अडवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात पाईपलाईनमधून गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर येताना दिसत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत या घटनेत कोणतीही मोठे नुकसान झालेले नाही.

नेमकं काय घडलं?

झाडाचा बुंधा काढताना जेसीबीचा धक्का लागल्याने महानगर गॅसची पाईपलाईनला गळती लागली. अचानक पाईपमधून प्रचंड प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागला. पाण्याचे फवारे उडावेत अशा पद्धतीने गॅस बाहेर पडत होता. गॅसच्या स्मेलमुळे नागरिकांना त्रास होत होता. पाऊण तासापासून ही गळती सुरू होती. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आणि महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे. लवकरात लवकर ही दुरूस्ती करणे गरजेचे आहे.

दारे खिडक्या बंद…

गॅसमुळे हवेत वास परसल्याने अनेकांना त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांनी घराच्या दारे खिडक्या बंद करून घेतल्या. त्रास होऊ नये म्हणून लोक खबरदारी घेत आहेत. तसेच गोखले रोडवरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून नागरिकांना गॅस गळतीच्या परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दादर मधील गैस गळती रोखण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल