AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी-पवारांच्या भेटीत राष्ट्रवादी NDA सोबत जाण्यावर शिक्कामोर्तब? तटकरे-शहांच्या भेटीने चर्चांना उधाण

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदी-पवारांच्या भेटीत राष्ट्रवादी NDA सोबत जाण्यावर शिक्कामोर्तब? तटकरे-शहांच्या भेटीने चर्चांना उधाण
Sharad Pawar and PM Modi Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 27, 2026 | 9:51 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तेव्हापासून शरद पवार यांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र आता पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी घेतली होती PM मोदींची भेट

गेल्या काही काळापासून शरद पवार यांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून NDA मध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अट घातल्याचेही समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यानंतर आता सूत्रांनी भाजप पवारांच्या राष्ट्रवादीला NDA मध्ये सामील करून घेण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. याबाबतच्या सूचनाही राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे.

सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला

समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक लोकप्रतिनिधी NDA सोबत जाण्यास तयार असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच आज अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला NDA मध्ये सहभागी करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होऊ शकते. असं झाल्यास NDA ची केंद्रातील ताकदही वाढणार आहे.  त्यामुळे राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य