Goa Assembly Election : उत्पल पर्रीकरांना भाजपकडून 2 मतदारसंघाची ऑफर, पण पर्रीकर पणजीवर ठाम! संभ्रम कायम

विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि उत्पल पर्रीकर उमेदवारीवरुन आमनेसामने आल्याचंही पाहायला मिळालं. अशावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडूनही उत्पल पर्रीकर यांनी पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना दोन मतदारसंघाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र, पर्रीकर हे पणजी मतदारसंघावर ठाम असल्याचं कळतंय.

Goa Assembly Election : उत्पल पर्रीकरांना भाजपकडून 2 मतदारसंघाची ऑफर, पण पर्रीकर पणजीवर ठाम! संभ्रम कायम
उत्पल पर्रिकर
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 9:15 PM

नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उत्पल पर्रीकर उमेदवारीवरुन आमनेसामने आल्याचंही पाहायला मिळालं. अशावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडूनही उत्पल पर्रीकर यांनी पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना दोन मतदारसंघाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र, पर्रीकर हे पणजी मतदारसंघावर ठाम असल्याचं कळतंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पल पर्रीकर यांना भाजपने दोन मतदारसंघाची ऑफर दिली आहे. मात्र, या दोन्ही मतदारसंघातून लढण्यास ते तयार नाहीत. उत्पल हे पणजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भाजपने दिलेल्या ऑफरवर उत्पल अद्यापही नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर आता पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे, असं कळतंय. दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं गोव्यात भाजपची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात बैठकांचं सत्र सुरु आहे. आज फडणवीसांना उत्पल यांच्या उमेदवारीबाबत विचारलं असता त्यांना बोलण्यास नकार दिला.

उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीबाबत फडणवीस काय म्हणाले?

12 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून उत्पल यांना उमेदवारी दिली पाहिजे, असं म्हणणं पूर्णपणे चूक असल्याचं म्हटलं. पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीच, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

उत्पल पर्रीकर यांचा फडणवीसांना सवाल

पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

काय आहे नेमका वाद?

पणजी मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होतो. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश पुढे भाजपवासी झाले.

2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली पाहिजे नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल परिकर यांनी सांगितले होते. मनोहर परिकर यांनी पणजीत केलेली विकासकामे, पणजीतून मनोहर परिकर यांना मानणारा त्यांचा मतदारवर्ग आणि पणजी आणि गोव्यासाठी त्यांचे असलेले योगदान याच्या जोरावर त्यांचे पुत्र उत्पल परिकर सध्या भाजपकडून पणजीसाठी तिकीट मागत आहेत.

इतर बातम्या :

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला

राज्यातील 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.