AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचा भारताला मोठा दणका? युद्ध सुरू असतानाच मोठा निर्णय, अडचणी वाढणार

सध्या युद्धामुळे मध्य पुर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता रशियानं मोठा निर्णय घेतला असून, एका रिपोर्टनुसार त्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

रशियाचा भारताला मोठा दणका? युद्ध सुरू असतानाच मोठा निर्णय, अडचणी वाढणार
Vladimir PutinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 9:48 PM
Share

अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये सध्या भीषण यु्द्ध सुरू आहे. या यु्द्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या अनेक देशांना इंधन टंचाईचा मोठा फटका बसत आहे. भारताला देखील याची झळ काही प्रमाणात पोहोचली आहे. पाकिस्तानला तर मोठा दणका बसला असून, पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे तब्बल 60 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. दरम्यान भारताला इंधन टंचाईचा फटका बसू नये यासाठी भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियानं देखील भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे एक अशी बातमी देखील समोर आली होती की, अमेरिकेनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियाकडून 30 दिवस कच्च तेल खरेदी करण्याची सुट दिली आहे. या बातमीमुळे भारतात मोठा गोंधळ उडाला होता. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र त्यानंतर अखेर आता यावर भारतानं प्रतिक्रिया दिली आहे, भारत सरकारने यावरून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आहे. आम्हाला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, आमच्या राष्ट्राचं हीत जिथे आहे, तिथून आम्ही किती प्रमाणात आणि कितीही दिवस कच्च्या तेलाची खरेदी करू शकतो असं भारतानं म्हटलं आहे. अमेरिकेनं 30 दिवसांची मुभा दिली मात्र त्यानंतरही गरज असेल तर रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच राहील असंही भारतानं म्हटलं आहे.

मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. रशियानं भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र पूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारताला रशियाकडून मोठी सूट देण्यात येत होती. मात्र आता ही सूट मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. भारताला आता कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताला तेलाच्या खरेदीमध्ये प्रती बॅरलमागे तब्बल 13 डॉलरची सूट देण्यात आली होती. मात्र आता ही सूट मिळणार नसून कच्च तेल अधिक किंमतीने खरेदी करावं लागणार आहे. हे तेल मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बंदरांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे भारतात इंधनाचे दर वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य