AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला

निकालात महाविकास आघाडीची सरशी झाली असली तर भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तसंच मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याचा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 19, 2022 | 8:34 PM
Share

दिल्ली : महाराष्ट्रात नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निकालात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाली असली तर भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. तसंच मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याचा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. दरम्यान, 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यातील सर्वाधिक 27 नगर पंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. तर त्यापाठोपाठ भाजपच्या ताब्यात 22 नगर पंचायती आल्या आहेत. तर 21 नगर पंचायतीसह काँग्रेस तिसऱ्या आणि 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.

नगर पंचायत निकालाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष राहिला आहे. आताही आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. 2017 मध्ये जेव्हा आमचं सरकार होतं, तेव्हा झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, त्यापेक्षाही जवळपास 65 जागा भाजपला जास्ती मिळाल्या आहेत. काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांनी साम, दाम, दंड, भेद असा सगळ्याचा वापर केला. सत्तेचा प्रचंड वापर करुनही त्यांना यश मिळालं नाही. जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास भाजप आणि पंतप्रधान मोदींवर कायम आहे’.

‘मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला’

‘जिल्हा परिषद निवडणुकीतही गोंदिया आणि भंडाऱ्यात आम्ही निवडून येऊ शकलो नव्हतो. आम्ही त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेत होतो. पण आता गोंदिया जिल्हा परिषदेत तर आम्ही बहुमताच्या जवळ पोहोचलो आहोत. भंडाऱ्यात कुणालाच बहुमत मिळालेलं नाही. आम्हाला अपेक्षित जागांपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मला असतं वाटतं की या सर्व निवडणुकीत भाजपला लोकांनी पसंती दिली आहे. महाराष्ट्रात निर्विवादपणे भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. महाराष्ट्रात ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय’, असा जोरदार टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

‘ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ या सरकारनं केला’

ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ या सरकारनं केला. आज तर सर्वोच्च न्यायालयात हे सरकार उघडं पडलं. आज सरकारच्या वकिलांनी सांगितलं की आमच्याकडे डेटा आहे आणि आम्ही तो सादर करु शकतो. मग कोर्टाने त्यांना डेटा सादर करायला लावला. दोन वर्षे केंद्र सरकारकडे बोट दाखवत या ठिकाणी कुठलं राजकारण हे सरकार करत होतं? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. तसंच हा डेटा सबमिट करुन पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने चांगली सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल झालं पाहिजे असं मला वाटतं. डेट्या संदर्भातील विषय आहे तो राज्य सरकार सांगू शकेल. पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो की आपल्याला कुठल्याही प्रकारे जनगणनेचा डेटा द्यायचा नाही. पण हे वारंवार त्याबाबतच गोष्टी करत होते. जे सत्य मी मागील दीड वर्षापासून सांगत होतो, ते त्यांना आज समजलं असावं. त्यामुळे डेटाच्या ऑथेन्टिसिटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे. राज्य सरकारने जर रिसर्च करुन एखादा डेटा दिला असेल, तर त्याच्या डिटेलमध्ये जाता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली एक निकाल दिलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला मिळेल, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

Goa Assembly Election : अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी; आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, राऊतांचा दावा

राज्यातील 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...