AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...

पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात…

| Updated on: Aug 15, 2026 | 5:01 PM
Share

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमित शाह गृहमंत्रीपदासाठी लायक नाहीत, अशी बोचरी टीका चव्हाण यांनी केली आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमित शाह गृहमंत्रीपदासाठी लायक नाहीत, अशी बोचरी टीका चव्हाण यांनी केली आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चव्हाण यांच्या टीकेचे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. पृथ्वीराज चव्हाण काय चुकीचे बोलले, असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी चव्हाण यांची पाठराखण केली.

जर एखाद्या गृहमंत्र्याला आदेश कोणी दिला हे माहीत नसेल, तर ते गृहमंत्री लायक नसून त्यांनी राजीनामा द्यावा, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मिश्किल टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा उजवा हात बरा झाला असेल तर त्यांना शुभेच्छा, असे वक्तव्य गोऱ्हे यांनी केले. २०१३-१४ मध्ये शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या फाईलवर सह्या होत नाहीत, तेव्हा आत्ताच्या नेतृत्वाच्या हाताला लकवा भरलाय का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला होता. याच जुन्या टीकेचा आधार घेत गोऱ्हे यांनी चव्हाण यांना लक्ष्य केले आहे.

Published on: Aug 15, 2026 05:01 PM

Follow Us