AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळी; टीम इंडिया 2 बाद 288 धावा

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने 2 गडी गमवून 239 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलच्या शतकामुळे भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड आहे.

IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळी; टीम इंडिया 2 बाद 288 धावा
IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 15, 2026 | 6:19 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 गडी गमवून 288 धावा केल्या. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. पण दुर्देवाने यशस्वी जयस्वाल 32 धावांवर असताना धावचीत झाला. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील संवादाच्या अभावामुळे टीम इंडियाला एक विकेट गमवावी लागली. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. 47 धावांवर यशस्वी जयस्वालची विकेट पडली होती. देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आली.

केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांची जोडी जमली होती. केएल राहुल 162 चेंडूंचा सामना करून 77 धावांवर खेळत होता. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला होता. पण टी ब्रेकनंतर मैदान उतरल्यानंतर वारंवार क्रॅम्प येत होते. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि वेदना असह्य झाल्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला गेला. देवदत्त पडिक्कलने अर्धशतकी खेळी करून आधीच जम बसवला होता. त्यानंतर त्याने कर्णधार शुबमन गिलसोबत डाव पुढे नेला. तसेच कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक साजरं केलं. त्याच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या 200 पार धावा झाल्या. कर्णधार शुबमन गिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याच्याकडून अपेक्षा भंग झाला. त्याने 28 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा करून बाद झाला. प्रभात जयसूर्याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

श्रीलंकेकडून फक्त प्रभात जयसूर्याला 1 विकेट मिळाली. या व्यतिरिक्त सर्व गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. शुबमन गिल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. ऋषभ पंतने पाच चेंडू खेळले नाही तोच पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. त्यामुळे काही काळ पाऊस जाण्याची वाट पाहावी लागली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा देवदत्त पडिक्कल नाबाद 131 आणि ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होता.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...