AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंचं खुलं चॅलेंज, राऊतांच्या त्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, माझ्या घरी…

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाबाबत मिनाक्षी शिंदे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घ्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंचं खुलं चॅलेंज, राऊतांच्या त्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, माझ्या घरी...
minakshi shinde reaction on pradeep purnekar murder caseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 9:09 PM
Share

काल रात्री ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णकर यांची हत्या झाली. त्यानंतर आज दिवसभर या प्रकरणाचे पडसाद ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी यावेळ ठाण्यात हजेरी लावलेली पाहायला मिळाली. त्यानंतर संजय राऊतांनी या हत्येमागे मिनाक्षी शिंदेच असल्याचे जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. आता या सर्व प्रकरणावर शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी पूर्णकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “सर्वप्रथम ही माझ्या प्रभागामध्ये झालेली दुर्दैवी घटना आहे. पण अशा प्रकारे कोणीही येऊन माझे नाव त्यामध्ये घालणं ही खरंतर चुकीची बाब आहे. पुरावे काय आहेत ते पोलिस शोधत आहेत. चौकशी करत आहेत. मला असं वाटतं की जे काही व्हायचं ते चौकशीअंती पोलिस प्रशासन या सगळ्या गोष्टींची माहिती घेईल.”

राऊतांच्या आरोपांना उत्तर

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझ्या घरी कट शिजला असं म्हणत असतील तर माझ्या घरी ते कधी होते, किंवा त्यांनी कधी याबद्दल माझ्या घरात बघितलं याचा पुरावा त्यांना द्यावा लागेल ना. बोलायचं म्हणून काहीही बोलायचं. सध्या लोकांचा रोष आहे. कारण की त्या घरातला मुलगा गेला आहे. त्या रागामध्ये ते बोलत असतील पण मला असं वाटतं की, अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी त्यांनी विचार केला पाहिजे की, प्रत्येकवेळी काहीही झालं की शिंदे गटातील मिनाक्षी शिंदे किंवा यांचं नाव वापरुन राजकारण करायचं. सध्या पूर्णेकरांची हत्या झाली आहे. त्याचं राजकारण करायला आदित्य आणि संजय राऊत येतात ही दुर्दैवी बाब आहे”, असंही मिनाक्षी शिंदे म्हणाल्या आहेत.

धमकीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

आदित्य यांनी सांगितलं की पूर्णेकरांना बघून घेऊ अशी धमकी तुम्ही दिली होती. त्यावर बोलताना मिनाक्षी यांनी सांगितलं की, “इलेक्शनच्या वेळी प्रभागामध्ये गोंधळ सुरु होता. वैचारिक मतभेद सगळ्यांचे असतात. गेली वीस वर्षे मी राजकारणात आहे. माझ्या त्या वक्तव्याला या प्रकरणाशी जोडणं योग्य नाहाी. जुने गोष्टी काढून मला गोवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझे पूर्णेकरांशी कोणतेही मतभेद नव्हते. ते सोशल मीडियावर रील्स बनवत होते. माझ्यावर आरोप करत होते. मला यामध्ये गोवण्यासाठी सगळं सुरु आहे. मी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माझा जबाब नोंदवणार आहे. मी सगळं सहकार्य करणार. मला फोन आला तर मी जाईन.”

त्या फोटोवर स्पष्टीकरण

तुमचे पती, पकडलेला आरोपी पप्या शिंदे यांचा एकत्रित असलेला फोटो आदित्य ठाकरेंनी पोलिसांनी दाखवला आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “राजकीय क्षेत्रात काम करताना कोणीही कोणासोबत फोटो काढतं तो काही पुरावा होऊ शकत नाही. त्यांचं फेसबुक पेज आणि व्हिडिओ पाहिले तर लक्षात येईल की, ते वारंवार ड्रग पेडलर्स विरोधात काही करत होते. मारहाण करत होते. त्याचे लाईव्ह व्हिडिओ टाकायचे.” त्यांनी स्वतः अनेक थ्रेट्स निर्माण केले असल्याचंही यावेळी मिनाक्षी शिंदे यांनी सांगितलं आहे.

पोलिस चौकशीतून सत्य समोर येईल

तुमच्या फेसबुक पोस्ट्सवरुन दिसतंय की तुमच्यामध्ये राजकीय वैर आहे. याप्रश्नावर बोलताना मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, “तुम्ही बघा मी कधीही त्यांच्याविरोधात पोस्ट केल्या नाहीत. तेच करायचे. त्यामुळे एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्यांना विरोधक खूप असतात. ते त्यांचं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करायचे. ते त्यांचं काम करायचे. पण बिनबुडाच्या आरोपांमधून काहीही होणार नाही. पोलिस चौकशीमध्ये सगळं स्पष्ट होईल.”

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...