इस्रायलमध्ये 9/11 ची पुनरावृत्ती टाळणारा बहाद्दर पायलट निघाला भारतीय वंशाचा, गुजरातशी आहे मूळ
इस्रायलला जाणाऱ्या विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आता जखमी होऊनही हल्लेखोर पायलटला जीवाची बाजी लावून रोखणारा बहाद्दर पायलट हा मूळचा भारतीय असल्याचे उघडकीस आले आहे.

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. या विमानातील एका पायलटने चाकूने सह पायलटवर चाकूने हल्ला करुन हे विमान हायजॅक करुन ते इस्रायलमध्ये क्रॅश करण्याचा प्रयत्न होता.आता नवीन माहिती उघडकीस आली आहे. त्यानुसार या विमानातील चाकू हल्ला होऊनही विमानाचा ताबा न सोडणारा दुसरा पायलट हा भारतीय वंशाचा असल्याचे उघडकीस आले आहे.
या विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवून हे विमान सुखरुपपणे लँड होईपर्यंत प्राणाची बाजी लावणाऱ्या पायलटचे नाव स्मित मछार असे असून तो मुळचा गुजरातचा होता अशी माहिती उघडकीस आली आहे. या भारतीय मूळ असलेल्या पायलटच्या धाडसाने आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानाने हे विमान हायजॅक न होता त्याचे सौदी अरबमध्ये सुखरुप लँडींग झाल्याचे उघडकीस आले आहे. अन्यथा दुसरे 9/11 घडले असते अशी भीती व्यक्त होत आहे.
भारतीय वंशाच्या कॅप्टनचे सर्वत्र कौतूक
फ्लाय दुबई फ्लाईट क्रमांक FZ1073 हे दुबईवरुन इस्रायलच्या तेल अविवला १८० प्रवाशांना घेऊन जात होते. या १८० प्रवाशांत २७ लहान मुले आणि इस्रायलचे नागरिक होते. इस्रायलच्या वृत्तानुसार को-पायलट हा ओमानी असून त्याने आपल्या मुख्य पायलटवर कॉकपिटमध्ये अचानक चाकू हल्ला केला. आणि विमानाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही पायलटमध्ये हजारो फूट उंचीवर कॉकपिटमध्ये हाणामारी सुरु होती.त्यामुळे विमान अचानक हजारो फूटांवर खाली आले. त्यामुळे १८० प्रवासी आणि कुमेंबर्स प्रचंड घाबरले. त्यानंतर या दोघांची झटापटी पाहून काही प्रवाशांनी कॉकपिटचा दरवाजा तोडला आणि हल्लेखोर पायलटवर नियंत्रण मिळवले त्यानंतर सौदीत विमान सुखरुप लँड झाले. अनेक जखमा होऊनही आपल्या विमानाचे नियंत्रण न सोडणारा कॅप्टन हा मूळचा भारतीय असून त्याचे नाव स्मित मछाल असे आहे आणि तो मूळचा गुजरातचा आहे.
