AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा संघ सहज जिंकला असता पण भारताने…शोएब अख्तरने नको ते ज्ञान पाजळले

Shoaib Akhtar On U19 Team India Victory: पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने आता तरुण भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनवर एक विधान केले आहे.

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा संघ सहज जिंकला असता पण भारताने...शोएब अख्तरने नको ते ज्ञान पाजळले
| Updated on: Nov 16, 2026 | 1:17 PM
Share

IND vs PAK U19 Mens Asia Cup 2026: एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध एका विकेटने रोमांचक विजय नोंदवला. भारताने ३३८ धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. सामन्याच्या एका निर्णायक क्षणी, मोहित उल्वा आणि मनाल चौहान यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. मोहित उल्वा आणि मनाल चौहान यांनी क्षणभर अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवली. अवघ्या ३५ चेंडूंमधील त्यांची ५७ धावांची भागीदारी भारताच्या निसटत्या विजयात निर्णायक ठरली.

मोहित उल्वाने २६ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा केल्या, तर चौहानने ३२ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. भारताने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून लक्ष्य गाठले. जेव्हा मोहित उल्वाने विजयी धावा केल्या, तेव्हा भारतीय खेळाडूंनी आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंना अत्यंत आक्रमकपणे निरोप दिला. या घटनेमुळे इंटरनेटवर वाद निर्माण झाला आहे. विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने पाकिस्तानी संघाला निरोप दिला.

भारतीय खेळाडूंच्या जल्लोषावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या आक्रमकतेचे कौतुक केले, तर काहींनी त्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, “माझ्या कारकिर्दीत ज्या भारतीय खेळाडूंविरुद्ध मी खेळला, त्यांच्याशी माझे चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. खेळांमध्ये आदर नेहमीच जपला पाहिजे, तरुण भारतीय खेळाडूंच्या उत्साहाचे कौतुकच आहे, पण त्याचबरोबर मैदानावर खेळताना खेळाडूंनी काही मूल्यांचा आदर केला पाहिजे.”

शोएब अख्तर म्हणाला, “आपल्याला केवळ क्रिकेट खेळायचे नाही, तर काही मूल्यांचे पालनही करायचे आहे. आजही मी सचिन तेंडुलकरबद्दल चांगल्या गोष्टी बोलतो. तो अजूनही जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे असे मला वाटते. वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली हे देखील माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एकमेकांविरुद्ध कधीही असे वागलो नाही.”

भारतीय १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंना माझा संदेश आहे: पाकिस्तानचा संघ खूपच चांगला होता, त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. का माहित नाही, पण ते दबाव हाताळू शकले नाहीत. नेहमीप्रमाणे, निर्णायक क्षणी दबाव कसा हाताळायचा हे भारताला माहीत आहे. भारताचे अभिनंदन. ते उत्कृष्ट क्रिकेट खेळले. भारताकडे उत्तम क्षमता आणि आत्मविश्वास होता, आणि त्यांच्याकडे सामना जिंकू शकणारे खेळाडू होते.” पाकिस्तानवरील या विजयासह भारताने विक्रमी नवव्यांदा १९ वर्षांखालील आशिया कप जिंकला.” असं शोएब अख्तर म्हणाले.

Follow Us
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!