AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: रोहित शर्माने IPL 2026 स्पर्धेची तयारी केली सुरू, मुंबई इंडियन्स जेतेपद मिळवणार?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच आयपीएल 2026 स्पर्धेची रंगीत तालीम सुरू झाली आहे. रोहित शर्मा या स्पर्धेच्या तयारीसाठी लागला आहे. गेल्या पाच पर्वात मुंबई इंडियन्सची जेतेपदाची झोळी रिती आहे.

Video: रोहित शर्माने IPL 2026 स्पर्धेची तयारी केली सुरू, मुंबई इंडियन्स जेतेपद मिळवणार?
रोहित शर्माने IPL 2026 स्पर्धेची तयारी केली सुरू, मुंबई इंडियन्स जेतेपद मिळवणार?Image Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 9:28 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी 8 मार्चला कळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यापैकी जो संघ चांगली कामगिरी त्याला जेतेपद मिळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे. असं असताना दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या 19 व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना संपताच आयपीएल 2026 स्पर्धेची चर्चा सुरू होणार यात काही शंका नाही. आयपीएल 2026 स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आह. आयपीएल मिनी लिलावात दहाही फ्रेंचायझींनी अपेक्षित बदल केले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने तयारी सुरू केली आहे. त्याच्या तयारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात त्याने नेट सराव केला.

मुंबई इंडियन्सने शेवटचं जेतेपद 2020 मध्ये मिळवलं होतं. तेव्हापासून 2021 ते 2025 या पाच पर्वात निराशा पदरी पडली आहे. त्यामुळे यंदा जेतेपदाची प्रबळ इच्छा घेऊन मुंबईचा संघ मैदानात उतरणार यात काही शंका नाही. मुंबई इंडियन्स संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. तसेच संघात सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आहे. त्यामुळे कागदावर तरी हा संघ ताकदवान दिसत आहे. यंदा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून रोहित शर्मा कामाला लागला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पण आयपीएलमध्ये खेळत आहे. यासाठी त्याने मैदानात जाऊन युवा गोलंदाजांचा सामना केला. या दरम्यान युवा गोलंदाजांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली.

दरम्यान, मागच्या पर्वात रोहित शर्मा फक्त फलंदाजी करताना दिसला होता. इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपाने मैदानात फलंदाजी करायचा आणि त्याला आराम दिला जायचा. आता रोहित शर्माने चांगला फिटनेस मिळवला आहे. पुन्हा एकदा स्लिम झाला आहे. तसेच त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याची जराही इच्छा नाही, असं बोललं जात आहे. रोहित शर्माचा सराव पाहता त्याला क्षेत्ररक्षणासाठी 20 षटकं मैदानात राहायचं आहे.

Follow Us
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? अंजली दमानिया मैदानात
Anjali Damania | चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? आता अंजली दमानिया मैदानात, मागितला हिशोब!
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटी
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय घडलं?
जशास तसे! मविआ'त मोठी घडामोड, थेट निर्णय... लेकाला विधान परिषदेत जागा
जशास तसे! मविआ'त मोठी घडामोड, थेट निर्णय...  लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका! आष्टीकरांविरोधात ग्रामस्थांचा संताप
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका! नागेश आष्टीकरांविरोधात ग्रामस्थांचा संताप, गद्दारी केल्यास परिणाम भोगावे लागतील
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर दिलेल्या उत्तराने खळबळ
घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर अंधारेंचा संताप
Sushma Andhare | घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा संताप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून...
Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून... दिल्लीत मोठं घडणार?
ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश
Omraje Nimbalkar | ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण