AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana 23rd Installment: आनंदवार्ता आली रे! या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता, इतक्या वाजता खात्यात येणार पैसा

PM Kisan 23rd Installment: पीएम किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याची चर्चा होती. याविषयीची आता अपडेट समोर आली आहे.

PM Kisan Yojana 23rd Installment: आनंदवार्ता आली रे! या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता, इतक्या वाजता खात्यात येणार पैसा
PM Kisan 23rd Installment will Credited on 20 June 2026
| Updated on: Jun 17, 2026 | 4:09 PM
Share

PM Kisan 23rd Installment will Credited on 20 June 2026 : देशातील कोट्यवधी शेतकरी, हे पीएम किसान योजनेशी जोडल्या गेलेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वर्षाला 6 हजार रुपये जमा होतात. पात्र शेतकर्‍यांना तीन टप्प्यात दोन हजार रुपये देण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता लागली होती. याविषयीची मोठी अपडेट आता समोर आली आहे. मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना येत्या तीन दिवसात पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे.

22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात

यावेळी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता देण्यात येईल

यापूर्वी या योजनेत आतापर्यंत एकूण 22 हप्ते जमा करण्यात आले आहेत

गेल्या 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता गुवाहाटी येथून वितरीत करण्यात आला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्ता

पीएम किसान योजनेचा हप्ता दरवेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी वितरीत करतील

यावेळी सुद्धा पीएम मोदी हे 23 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील

पीएम मोदी लोकांना संबोधित केल्यानंतर डीबीटी प्रणालीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करतील

कुठून आणि कधी मिळेल 23वा हप्ता?

पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता देण्यात येईल

हा हप्ता 3 दिवसांनी 20 जून रोजी देण्यात येईल

पीएम नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील हुगळी येथील तारकेश्वर येथून 23 वा हप्ता वितरीत करतील

याविषयीची अधिकृत माहिती पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून देण्यात आली आहे

20 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा करण्यात येईल

9.44 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरीत होईल

तुमचे स्टेट्‍स कसे तपासाल?

पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता पात्र शेतकर्‍यांना चार महिन्यांनी मिळतो. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांच्या खात्यात दोन हजार जमा होतात. या योजनेची यादी शेतकऱ्यांना घरबसल्या तपासता येते. त्यासाठी अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडावा लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जावे लागेल. याठिकाणी तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाकावा लागेल. आता “Get Data” वर क्लिक करुन लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक करावे लागेल.

ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी