AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: तुमच्याही खात्यात नाही जमा होणार 23 वा हप्ता… हे काम केलं का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट

PM Kisan 23rd Installment: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी एक मोठं काम शेतकर्‍यांना पूर्ण करावं लागणार आहे. नाहीतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अनुदानापासून त्यांना वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana: तुमच्याही खात्यात नाही जमा होणार 23 वा हप्ता... हे काम केलं का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 23 वा हप्ताImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 14, 2026 | 2:56 PM
Share

PM Kisan 23rd Installment: येत्या 30 जून पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार असल्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे ई केवायसी अपूर्ण असलेल्या शेतकरी बांधवांनी ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जाम होणार आहे. त्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते.

तर अडकू शकतो हप्ता

जर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासोबतच शेतजमिनीचा पडताळा, आधार लिकिंग आणि दस्तावेजातील नावातील चूक हे लागलीच दुरूस्त करणे आवश्यक आहे.

eKYC अपूर्ण – ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता आहे. अगोदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

दस्तावेजातील नावात चूक – आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात स्पेलिंग चुकीचे असेल तर तर हप्ता जमा होणार नाही.

शेतजमिनीचा पडताळा- बँक खाते आणि पीएम किसान पोर्टलवर जमिनीच्या दस्तावेजांचा अगोदर पडताळा करा.

आधार लिंकिंगची अडचण- बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. DBT (Direct Benefit Transfer) हा पर्याय नेहमी इनेबल ठेवा.

जालन्यात 2 हजार 102 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जालना जिल्ह्याच्या कृषी विभागाने असं आवाहन केलाय. जिल्ह्यात एकूण 3 लाख 8 हजार 77 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 3 लाख 5 हजार 975 शेतकर्‍यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तर 2 हजार 102 शेतकरी बांधवांची केवायसी अद्यापही अपूर्ण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 30 जून ही तारीख अंतिम मुदत देण्यात आलेली असून त्यानंतर पी एम किसान योजनेचा हप्ता बंद होणार आहे.

23 वा हप्ता पुढील महिन्यात

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता हा प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. योजनेचा 22 वा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला. चार महिन्यांच्या अंतराने 23 वा हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने हप्त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण 30 जूनपर्यंत केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने हा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?