अमेरिकेत मोठी खळबळ! बॉम्बसारखे कोसळले विमान, एकही प्रवासी जिवंत नाही, थेट..
अमेरिकेत मोठ्या विमान अपघाताची घटना घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विमान अपघाताने एकच मोठी खळबळ उडाली. विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाहीये.

अमेरिकेत धक्कादायक घटना घडली. अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडा येथे एका विमानाचा भीषण अपघात झाला. विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला. आकाशातून वेगाने हे विमान खाली येताना दिसले. विमान जमिनीवर आदळले आणि मोठा स्फोट झाला. कोणाला काही कळण्याच्या आताच आगीचा भडका उठला. या अपघातात विमानात असलेले सर्व नऊ जण ठार झाले. विमान घरांच्या थोडे दूर कोसळले. ज्याठिकाणी हे विमान कोसळले, त्याच्या आजुबाजूला घरे होती. लोकांनी मोठा आवाज येताच बाहेर धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्वकाही संपले होते. हे विमान नऊ लोकांना घेऊन जात होते. मात्र, वेगाने खाली आले. पायलटला काहीच करण्यास वेळ मिळाला नाही. मात्र, या विमान अपघाताने एकच खळबळ उडाली. विमानाला मोठी आग लागली पण आसपासची घरे सुरक्षित राहिली.
धडक इतकी जास्त जोरदार होती की, वर्दळीच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला. विमान कोसळल्यानंतर परिसरात आगीचे मोठे धुर बघायला मिळाले. ही घटना पाम बीच काउंटीमधील क्रेस्टहेव्हन परिसराजवळ घडली. अपघाताचे ठिकाण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या मार ए लागो रिसॉर्टपासून सुमारे जवळ आहे. 14 किलोमीटर दूर अंतरावरच हा अपघात झाला.
विमान अपघातानंतर गोंधळाची परिस्थिती बघायला मिळाली. प्रत्यक्षदर्शींनी पाहिले की विमान घरांच्या आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या अगदी जवळ कोसळले. थोडक्यात काही लोक बचावले. या विमान अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओही पुढे येत आहेत. विमान कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. जवळून जाणाऱ्या गाड्यांमधील लोकांना विमान जमिनीच्या दिशेने वेगाने येताना दिसले.
The private jet that went down just miles from Mar-a-Lago had 9 people on board, according to the FAA.
The plane crashed in a residential area near Cresthaven, Florida.
The aircraft had departed from Austin-Bergstrom International Airport in Texas and was on its way to North Eleuthera Airport in the Bahamas when it crashed.
According to the New York Post, the plane took a “sharp right turn” before nosediving into the ground from about 8,000 feet.
The plane is a $2 million Learjet 60, according to the Post.
Witnesses on the ground say the crash sounded like a missile.
— Collin Rugg (@CollinRugg) November 1, 2026
हेच नाही तर विमान आकाशातून वेगाने येताना आणि जमिनीवर कोसळतानाचा व्हिडीओ काही लोकांनी काढला. अपघातस्थळावरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत. रस्त्याच्या क्षतिग्रस्त भागांच्या आसपास ज्वाळाही दिसून येत आहेत. या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. हा विमान अपघात नक्की कसा झाला, याचा तपास हा केला जात आहे.
