AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे; महारॅलीवर संतापली शीख संघटना, नेमकं कारण काय?

शीख रॉयट्स व्हिक्टिम्स वेल्फेअर सोसायटीने विरोधी पक्षाच्या रॅलीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की हा काळा दिवस आहे आणि या दिवशी काँग्रेसने आपली मान लाजेने खाली घालवली आहे. आता नेमकं काय झालं? वाचा...

काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे; महारॅलीवर संतापली शीख संघटना, नेमकं कारण काय?
Rahul GandhiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 7:27 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. इंडिया आघाडीमधील नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काल देखील पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीकडून दिल्लीमधील रामलीला मैदानात पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारण्यात आलं. दिल्लीतील रामलीला मैदानात १ नोव्हेंबरला आयोजित महारॅलीबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे म्हणणे आहे की शीखविरोधी दंगलीच्या वर्धापनदिनीच काँग्रेसने ही रॅली का काढली होती. यासाठी दुसरा दिवसही ठेवता आला असता. या प्रसंगी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या नेतृत्वाखाली हरिनगर ते तिलकनगरपर्यंत एक मोर्चा काढण्यात आला. त्यात मुख्यमंत्री रेखा गुप्ता, मंत्री मजिंदर सिंह सिरसा आणि ज्येष्ठ वकील एचएस फूलकाही सहभागी होते.

शीख संघटनांनी उपस्थित केले प्रश्न

फूलका म्हणाले, “१ नोव्हेंबर हा केवळ शिखांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी काळा दिवस आहे. काँग्रेसनेही या दिवशी शरमेने मान खाली घालावी. भव्य रॅली काढण्यासाठी त्यांना हाच एक दिवस सापडला का?” १९८४ दंगल पीडित कल्याण संस्थेनेही रॅलीच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संघटनेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची भेट घेतली आणि सांगितले की, हा दिवस शोकदिन म्हणून पाळला पाहिजे, त्याचा राजकीय डावपेच म्हणून वापर केला जाऊ नये. त्यांनी गृहनिर्माण, रोजगार आणि पुनर्वसनासाठीच्या आपल्या मागण्यांचा पुनरुच्चारही केला.

सोसायटीचे अध्यक्ष सुरजीत सिंह यांच्यासोबत सोसायटीच्या महिला विंगच्या अध्यक्षा बीबी गुरदीप कौरही राज्यपालांना भेटायला गेल्या होत्या. त्यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील ८ जण या दंगलीत मारले गेले होते. तर राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी पीडित कुटुंबांना भेट दिली. त्यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील चार जण दंगलीत मारले गेले होते.

भाजपचे वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरले

भाजपने देशाच्या अनेक भागांत आंदोलने आणि पदयात्रा आयोजित केल्या. त्यात पक्ष अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरले. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी हरियाणातील रोहतक येथे आणि महायुतीच्या सहयोगी पक्षांनी मुंबईत ‘लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा’ अशी पदयात्रा काढली.

काँग्रेसवर टीका करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या वर्धापनदिनी रॅली काढल्यामुळे राहुल गांधी यांची तीव्र टीका केली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले की राहुल गांधी एक नोव्हेंबरच्या काळ्या इतिहासाची झापड घालू शकत नाहीत आणि देश ‘दंगा-आधारित राजकारणा’ऐवजी संविधान आणि जनआदेशानुसार चालेल.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती