Gautam Gambhir: भीतीपोटी क्रिकेट खेळणं…मालिका जिंकल्यानंतरही गौतम गंभीरनं सगळ्यांना सुनावलं
Gautam Gambhir On Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. आता या मालिकेनंतर गौतम गंभीरने एक विधान केले त्याची चर्चा होत आहे.

IND vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक टी-२० मालिका ३-२ ने जिंकल्यानंतर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तर नेहमीप्रमाणे आक्रमक अंदाजात दिली.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, गौतम गंभीर त्यांच्या कठोर भूमिकेसाठी आणि स्पष्टवक्त्या वक्तव्यांसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. पत्रकार परिषदेत, जेव्हा माध्यमांनी संघाच्या काही निर्णयांवर आणि सतत बदलणाऱ्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न विचारले, तेव्हा गंभीर यांनी स्पष्ट केले की मी बाहेरील टीका किंवा कोणाला घाबरत नाहीत. जेव्हा गंभीरला संघाची रणनीती, टीका आणि खेळाडूंच्या निवडीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने एका ओळीत उत्तर दिले. मी आपल्या प्रशिक्षणाबद्दल आणि निर्णयांबद्दल कोणालाही घाबरत नाहीत.”
गंभीरने सांगितले की, माझे संपूर्ण लक्ष एक असा निर्भय संघ तयार करण्यावर आहे, जो जगात कुठेही जाऊन कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू शकेल. संघ व्यवस्थापन खेळाडूंना पाठिंबा देण्यावर आणि त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यावर विश्वास ठेवते. जय-पराजय हा खेळाचाच एक भाग आहे, पण भीतीपोटी क्रिकेट खेळणे ही भारतीय संघाची संस्कृती कधीच असू शकत नाही.”
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने सलामीचा सामना जिंकून शानदार सुरुवात केली, ज्यामुळे संघाला मालिका ३-२ ने जिंकण्यास मदत झाली. मात्र, मालिकेच्या शेवटच्या सामन्यांमध्ये किवी संघाने जोरदार पुनरागमन केले. ग्लेन फिलिप्सने या मालिकेत अनेक विक्रम मोडणाऱ्या खेळी केल्या. त्याने पाच सामन्यांमध्ये ३४१ धावा केल्या. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंड संघ शेवटचे दोन सामने जिंकू शकला.
या सामन्यात भारतीय गोलंदाजाची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. भारतीय फंलदाजांनी अनेक्र पराक्रम केले पण गोलंदाजांना तसं काही करता आलेले नाही. आता वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
