AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar | ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण

Omraje Nimbalkar | ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण

| Updated on: Jun 17, 2026 | 1:11 PM
Share

राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असताना ओमराजे निंबाळकर यांच्याबाबतही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात ओमराजे निंबाळकर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर या चर्चांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओवर अनेक समर्थकांनी प्रतिक्रिया देत “ओमराजे गद्दारी करू नका”, “दादा, ठाकरे साहेबांसोबतच राहा” अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडिओ पोस्ट होताच काही मिनिटांतच अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याचे दिसून आले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत त्यांच्या समर्थकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटातील निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे त्यांचे नावही ‘ऑपरेशन टायगर’शी जोडले जात असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत.

दरम्यान, या सर्व चर्चांमध्ये ओमराजे निंबाळकर कोणती भूमिका घेतात आणि पुढील काही दिवसांत याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 17, 2026 01:11 PM

Follow Us