AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदाराला पहिला मोठा झटका, थेट.., राजकारणातून सर्वात मोठी बातमी

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं समोर आलं आहे. 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदाराला पहिला मोठा झटका, थेट.., राजकारणातून सर्वात मोठी बातमी
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 4:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातून 6 खासदार फुटले आहेत. तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात देखील नुकतीच मोठी फूट पडली होती. 20 खासदारांनी पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये या सर्व घडामोडी घडत असतानाच उद्धव ठाकरे यांनी देखील सावध भूमिका घेत रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. 5 व्हिसीद्वारे उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे.

तेव्हाच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. 6 खासदार हे ठाकरे गटातून फुटले आहेत. ते वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून जे खासदार फुटले आहेत, त्यांच्यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील समावेश आहे. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कृष्णा पाटील आष्टीकर यांनी या सर्व प्रकरणावर घेतलेली भूमिका ही नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आघाडीचा होतो आणि आघाडीचाच राहणार आहे. कुठली तरी बातमी आली आणि माझ्यावर शंका उपस्थित केली जात आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा पळून जाणार गडी नसून मैदान मारणारा गडी आहे.  समोरच्यांना आवाहन पेलावत नसल्याने संभ्रम पसरविला जातो आहे. भूलथाप्पांना बळी पडू नका, अशी आपली भूमिका यावेळी कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जाहीर केली आहे.

Follow Us
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी