अन्यथा तुमच्या घरासमोर ढोल बडवणार, घरमालक असाल तर इकडे लक्ष द्या…

| Updated on: Oct 14, 2022 | 9:25 PM

शहरातील नाशिक पूर्व ६००, नाशिक पश्चिम २००, नाशिकरोड १५३, सातपूर १४२, सिडको १४०, पंचवटी २३ असे एकूण १,२५८ लाखाच्या वरील थकबाकीदार आहेत.

अन्यथा तुमच्या घरासमोर ढोल बडवणार, घरमालक असाल तर इकडे लक्ष द्या...
Image Credit source: Google
Follow us on

Nashik News : नाशिक महानगर पालिकेने (NMC) घरपट्टी थकबाकीदार यांना चांगलेच रडारवर घेतले आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झालेला असतांना पालिकेच्या करवसुली (Tax Recovery) पथकाने थकबाकीदार यांच्याकडील थकीत कर करण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी पासून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाखाच्यावर थकीत घरपट्टी असलेल्या मालकांच्या घरासमोर जाऊन ढोल बडवणार आहे. रक्कम मिळत नाही अथवा धनादेश प्राप्त करून दिला जात नाही तोपर्यंत ढोल वादन सुरूच राहणार आहे. कर विभागाने याबाबत आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता, त्यावर आयुक्तांनी मंजूरी देत सोमवार पासून पालिकेच्या सहाही विभागात ही मोहीम सकाळपासूनच सुरू होणार आहे. जवळपास 1258 थकबाकीदार असे आहेत, ज्यांच्याकडे लाख रुपयांच्या वर घरपट्टी थकीत आहे.

नाशिक महानगर पालिकेने गेल्याच आठवड्यात लाखाच्या वर थकबाकीदार आहेत त्यांना कर भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या.

नाशिक महानगर पालिकेच्या कर विभागाने या नोटिसा पाठविल्या होत्या, त्यानंतरही अनेकांनी घरपट्टी भरली नसून बड्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

पालिकेची आर्थिक स्थिती बघता कोरोनानंतर मोठा आर्थिक भार पालिकेवर आला आहे. त्यातच कोरोनानंतर करवसूली मोहीम देखील थंडावली होती.

मात्र, कोरोना उलटून जवळपास वर्षे उलटत आले आहेत, पालिकेची आर्थिक स्थिती नाजुक आहेत, त्यामुळे पालिकेने घरपट्टी वसुलीच्या मोहिमेला गती दिली आहे.

शहरातील नाशिक पूर्व ६००, नाशिक पश्चिम २००, नाशिकरोड १५३, सातपूर १४२, सिडको १४०, पंचवटी २३ असे एकूण १,२५८ लाखाच्या वरील थकबाकीदार आहेत.

ही वसूली करण्यासाठी लागणारे ढोल पथक याची निविदा काढण्यात आली होती, त्यानुसार सोमवार पासून कंत्राटदार प्रत्यक्षात काम सुरू करणार आहे.

ही वसूली करत असतांना जियो टॅगिंग केले जाणार आहे, त्यावेळी चित्रीकरण देखील केले जाणार असून सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा रक्षक देखील उपस्थित असणार आहे.