Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

| Updated on: Feb 08, 2022 | 8:51 AM

ग्रामीण भागातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला फिरत्या रुग्णालयाचा क्रमांक माहीत असला पाहिजे. सावनेर, उमरेड या भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसाच तो रामटेक भागातही मिळाला पाहिजे असेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं.

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा
बैठकीत बोलताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
Follow us on

नागपूर : अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या गुराढोरांना. त्यामुळं शासनाच्या पशुधन विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेईल, यासाठी प्रयत्न करावा. गुरे, शेळी- मेंढीपासून कोंबड्यांपर्यंत सर्वांचाच विमा काढता येतो. सहज सुलभ असणारी ही योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात माहिती झाली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने (Animal Husbandry ) प्रसिध्दी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sports and Youth Welfare Minister Sunil Kedar) यांनी दिले. नागपूर येथे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी सोमवारी घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय पशुधन योजनेची सद्यस्थिती, कृत्रिम रेतन, लिंग विनिश्चितीकरण, वैरण विकास, औषध उपलब्धता, लसीकरण व लस उपलब्धता, दवाखान्यांची स्थिती, एकात्मिक कुक्कुट पालन योजना, राष्ट्रीय पशुधन अभियानाचा (National Livestock Mission) आढावा घेतला.

सर्वच पशूंचा निघतो विमा

जिल्हा वार्षिक योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाला देण्यात आलेल्या निधीची माहिती केदार यांनी घेतली. तसेच नावीन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात कोणते वेगळे प्रयोग पशुसंवर्धन विभाग राबवीत आहे, याची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी पशुधन विमा योजनेसंदर्भात गावातील शेतकऱ्यांना अद्याप माहिती नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. प्रत्येक गावांमध्ये या संदर्भात माहिती गेली पाहिजे. पशुपालन करताना अचानक जनावर दगावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्याची, पशुपालकांची आर्थिक स्थिती आणि जनावरांच्या आजच्या किमती बघता प्रत्येक जनावराचा विमा काढला जाणे आवश्यक आहे. गाय, म्हैस, बैल, संकरित पशुधन, शेळ्या-मेंढ्या, घोडे, गाढव, उंट, डुक्कर, ससे सर्वांचाच विमा निघतो. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन अनुदानित, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ मार्फत विमा उपलब्ध केला जात आहे. सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

फिरत्या रुग्णालयाची माहिती ग्रामीण भागात हवी

वैरण विकास संदर्भात सुनील केदार यांनी आढावा घेतला. यावेळी कंत्राट प्रक्रिया रेंगाळल्यामुळे पशुधनासाठी वैरण उपलब्ध नाही, असे होता कामा नये. याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित केली जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने करावी, असे निर्देशही त्यांनी मुंबई येथील अधिकाऱ्यांना दिले. तातडीची सुविधा म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये फिरता पशु दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र यावर नेमणूक करताना डॉक्टरांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे. शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. हे लक्षात ठेवून ही योजना राबवावी, तसेच अधिकाअधिक कॉल येतील यासाठी कॉल नंबर सर्वत्र दिला जाईल याची खात्री करावी.

शेतकऱ्याचं लेकरु जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकात झळकलं, बुलडाण्याच्या राजू केंद्रेची मोठी झेप

‘Mai Jhukega Nahi Mummy’ म्हणत तरुणाचा Srivalli गाण्यावर भन्नाट Dance, Video Viral

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स