AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Mai Jhukega Nahi Mummy’ म्हणत तरुणाचा Srivalli गाण्यावर भन्नाट Dance, Video Viral

Srivalli funny video : अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा (Pushpa) सिनेमाचा ज्वर काही कमी होताना दिसत नाही. Srivalli funny video : अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा (Pushpa) सिनेमाचा ज्वर काही कमी होताना दिसत नाही. यावरच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

'Mai Jhukega Nahi Mummy' म्हणत तरुणाचा Srivalli गाण्यावर भन्नाट Dance, Video Viral
श्रीवल्ली गाण्यावर तरुणांचा व्हिडिओ
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 08, 2022 | 8:30 AM
Share

Srivalli funny video : अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा (Pushpa) सिनेमाचा ज्वर काही कमी होताना दिसत नाही. पुष्पा सिनेमातले डायलॉग्स, गाणी सर्वच हीट झालंय. यातल्या गाण्यांवर रील्स मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर शॉर्ट व्हिडिओजही मोठ्या प्रमाणात अपलोड होत असून यूझर्सना ती पसंत पडतात आणि मग व्हायरल होतात. श्रीवल्ली (Srivalli) हे या सिनेमातलं एक लोकप्रिय गाणं आहे. या गाण्यावर तर रोजच व्हिडिओ बनत असलाचं आपल्याला दिसून येईल. कुणी यावर डान्स करतंय. तर कुणी भजन म्हणतंय. तर कुणी विनोदी व्हिडिओ अपलोड करत आहे. विनोदी प्रकारातलाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. सिनेमातला ‘मैं झुकेगा नहीं’ डागलॉग आणि श्रीवल्ली गाणं वापरून एक विनोदी व्हिडिओ तयार करण्यात आलाय.

‘मैं झुकेगा नहीं’

व्यंगात्मक विनोदी असा हा व्हिडिओ आहे. दोन तरूण आहेत. त्यात एकानं आईची भूमिका केलीय. व्हिडिओमध्ये त्यातला एक तरूण प्लेटमध्ये खाताना दिसतोय. उभं राहून तो खातोय. खाता खाता त्याला शिंक येते आणि त्याच्याकडून खाली सांडतं. तेवढ्यात आईची भूमिका करणारी व्यक्ती येते आणि त्याला साफ करायला सांगते. यावेळी हा तरूण तिकडून कोणीतरी कापड फेकतं आणि न वाकता तो सांडलेलं साफ करतो आणि श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतो. बॅकग्राऊंडला श्रीवल्ली हे गाणं आपल्याला ऐकू येईल. शेवटी तो ‘मैं झुकेगा नहीं’ म्हणतो.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर चेतन मोंगा व्लॉग्स (Chetan Monga Vlogs) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 6 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 2.9 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. तर ‘Mai Jhukega Nahi Mummy‘ असं कॅप्शन देण्यात आलंय. यूझर्सनी व्हिडिओला लाइक केलंय. तसंच कमेंट्सही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. (Video Courtesy – Chetan Monga Vlogs)

वर म्हणतो, ‘मैं झुकेगा नहीं; यूझर्स म्हणतायत, आता नाही पण भांडी घासताना मात्र झुकावंच लागेल! Video viral

Kacha Badam : बंगालीनंतर आता हरयाणवी व्हर्जननं घातलाय धुमाकूळ, 32 लाखांहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

Tap Tea : नळावर पाणी नाही चहा मिळतोय तोही फुकट! चहाप्रेमींनो, हा Viral Video तुमच्यासाठी आहे..!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली