AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर म्हणतो, ‘मैं झुकेगा नहीं; यूझर्स म्हणतायत, आता नाही पण भांडी घासताना मात्र झुकावंच लागेल! Video viral

Wedding funny video : सध्या सोशल मीडियात अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटातील डायलॉग 'मैं झुकेगा नहीं (Main Jhukega Nahi)... हा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. लग्नाचा एक विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वर म्हणतो, 'मैं झुकेगा नहीं; यूझर्स म्हणतायत, आता नाही पण भांडी घासताना मात्र झुकावंच लागेल! Video viral
वरावर चढला पुष्पा चित्रपटाचा ज्वर
| Updated on: Feb 07, 2022 | 3:53 PM
Share

Wedding funny video : सध्या सोशल मीडियात अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटातील डायलॉग ‘मैं झुकेगा नहीं (Main Jhukega Nahi)… हा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. यावर रील्सही मोठ्या प्रमाणात तरुणाई करताना दिसत आहे. तर विविध ठिकाणी या डायलॉगवर व्हिडिओ केले जात आहेत. ते व्हायरल होत आहेत. दरम्यान, लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वर पुष्पा चित्रपटाचा आनंद लुटताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वधूच्या हस्ते माला घालतेवेळी अल्लू अर्जुनच्या शैलीत वराने माला घालण्यास नकार दिला. त्याचवेळी वराची ही वृत्ती पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आधी आश्चर्यचकित झाले. मग समारंभात हशा पिकला. खोडकर वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पिकला हशा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की वरमालाच्या वेळी वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत, तर त्यांचे नातेवाईक, मित्र आणि पाहुणे हा सुंदर क्षण त्यांच्या मोबाइलमध्ये कैद करत आहेत. वधू आणि वर दोन्ही हातात हार धारण करतात. दरम्यान, वधू वराला हार घालण्यासाठी पुढे जाते. पण नंतर वर तिला थांबवते. हे बघून तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले. यानंतर, वर अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये वधूला सांगतो- ‘मैं झुकेगा नहीं’, हे ऐकून तेथे उपस्थित सर्व लोक हसू लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वरही अल्लू अर्जुनप्रमाणेच दाढीवरून हात फिरवत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

वधू-वराचा हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की वरमाला विथ ट्विस्ट, मी झुकेगा नहीं साला’. व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

यूझर्सच्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सकडूनही मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. वराला सल्ला देताना एका यूझरने लिहिले आहे, की भावा, आता झुकू नकोस पण भांडी धुण्यासाठी तुला झुकावच लागेल. दुसऱ्या यूझरचे म्हणणे आहे, की वधूने लग्नाला नकार दिल्यावर ट्विस्ट आला असता.

मजुराच्या जुगाडाचा ‘हा’ Video पाहून तुम्हीही म्हणाल, हे IITमध्ये का शिकवलं जात नाही?

Tap Tea : नळावर पाणी नाही चहा मिळतोय तोही फुकट! चहाप्रेमींनो, हा Viral Video तुमच्यासाठी आहे..!

Video : तेरी शकल गंदी, ओ नल्ली, बासी बर्फी तू कल की…; Srivalli गाण्याचं Siblings Version पाहिलं का?

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.