AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘पुष्पाsss… पुष्पा राज! मै झुकेगा नहीं’ म्हणत तयार केलेले Reels पोट दुखेपर्यंत हसवतील!

मुळात तेलुगुमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पाच्या हिंदी वर्जनलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. अर्थात यानंतर अनेकांनी पुष्पा सिनेमाचे वेगवेगळे रिल्स (Reels) केले आहे. ज्याची सोशल मीडियात (Social media) तुफान चर्चा रंगली आहे. चला तर पाहुयात, असेच काही हटके रिल्स...

Video | 'पुष्पाsss... पुष्पा राज! मै झुकेगा नहीं' म्हणत तयार केलेले Reels पोट दुखेपर्यंत हसवतील!
पुष्पा राज सिनेमावर चाहत्यांचे रिल्स आणि रिल्सवरती बनले मीम्स
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 2:56 PM
Share

पुष्पा सिनेमात (Pushpa The Rise in Hindi) अल्लू अर्जुनची (Allu arjun) ऍक्शन पाहून चाहते घायाळ झाले. रश्मिकाच्या (Rashmika) ठुमक्यांनी तर या सिनेमाला आणखीनंच चारचांद लावले. सिनेमाल रिलीज होऊन आता जवळपास महिना व्हायला आला आहे. पण अजूनही बॉक्सऑफिसवर सिनेमाची कमाल कमाई सुरु आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर हिंदी-मराठी पाहणारे प्रेक्षकही पुष्पाला डोक्यावर घेत असल्याचं बॉक्सऑफिसच्या (Box Office) आकडेवारीतून दिसतंय. मुळात तेलुगुमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पाच्या हिंदी वर्जनलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. अर्थात यानंतर अनेकांनी पुष्पा सिनेमाचे वेगवेगळे रिल्स (Reels) केले आहे. ज्याची सोशल मीडियात (Social media) तुफान चर्चा रंगली आहे. चला तर पाहुयात, असेच काही हटके रिल्स…

पुष्पा सिनेमातला अल्लू अर्जुनचा एक डायलॉग चांगलाच गाजतोय. ‘पुष्पाsss… पुष्पाराज! मै झुकेगा नहीं’ असं म्हणत अनेकांनी रिल्स तयार केले आहेत. पण त्यातील काही reels पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. मराठी ट्रेन्ड्स नावाच्या फेसबुक पेजवरुन असंच एक रिल शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये मै झुकेगा नहीं साला म्हणणाऱ्याला चक्क स्वस्तातला अल्लू अर्जुन म्हणण्यात आलंय. असं नेमकं काय केलंय, या स्वस्तातल्या अल्लू अर्जुननं? पाहा हा व्हिडीओ..

तब्बल 19 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर फेसबुकवर रिएक्ट केलंय. तर 2.4 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण पोट धरुन हसलेत.

तर दुसरीकडे आणखी एकानं पुष्पा सिनेमाचं केलेलं रिल हा तर चक्क मीमचा विषय बनलाय. मराठी मीम मॉक्सवर या रिलला घेऊन अनेकांनी मीम्स साकारले आहेत. पुष्पा सिनेमाचं हे मीम पाहून अल्लू अर्जुनलाही रडू येईल, अशा विनोदी प्रतिक्रिया हे रिल पाहून अनेकांनी दिल्या आहेत.

हे रिल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सिंघम सिनेमातलं टेम्लेट वापरुन काहींनी यावर मीम तयार केले आहेत.

काहींना या पठ्ठ्याचं रिल पाहून जत्रा सिनेमातले कान्होळे आठवलेत.

 इतर बातम्या –

Video | तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवानांची गरोदर महिलेला मदत, खांद्यावर उचललं आणि चालू लागले!

नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Viral Video : मासे विकताना दिसली सुंदर मुलगी, यूझर्स म्हणतायत विश्वास नाही बसत!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.