नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

नोरा फतेही(Nora Fatehi)चे गाणे येते तेव्हा ते सोशल मीडिया(Social Media)वर हिट होतेच. तिचे नुकतेच रिलीज झालेले 'नाच मेरी रानी' (Naach Meri Rani) हे गाणेही धुमाकूळ घालत आहे. या गाण्यावर मुली रील बनवत आहेत

नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
डान्स करताना चिमुरडी

जेव्हा जेव्हा नोरा फतेही(Nora Fatehi)चे गाणे येते तेव्हा ते सोशल मीडिया(Social Media)वर हिट होतेच. लोक तिच्या गाण्यांवर डान्स(Dance)चे व्हिडिओ (Video) बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. नोरा फतेहीचे नुकतेच रिलीज झालेले ‘नाच मेरी रानी’ (Naach Meri Rani) हे गाणेही धुमाकूळ घालत आहे. या गाण्यावर मुली रील बनवत आहेत आणि या गाण्याचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहेत.

नोरा फतेहीनेही केले असते कौतुक यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. खुद्द नोरा फतेहीनेही या मुलीचा डान्स पाहिला तर तिही तिचं कौतुक करेल. मुलीचा डान्स लोकांना खूप आवडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चिमुरडी गाण्याच्या सर्वच स्टेप्सना हुबेहूब फॉलो करताना दिसत आहे.

स्टेप टू स्टेप डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी पार्कमध्ये डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहे. नोरा फतेही आणि गुरू रंधावा यांच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर ही मुलगी धमाकेदार डान्स करत आहे. लहान मुलगी स्टेप टू स्टेप डान्स करत असलेली एनर्जी पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

सोशल मीडिया यूझर्स अचंबित व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ती प्रत्येक स्टेप हुबेहुब नोरा फतेहीप्रमाणे करत आहे. मुलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्सही अप्रतिम आहेत. इतक्या कमी वयात मुलीचा एवढा जबरदस्त डान्स पाहून सोशल मीडिया यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत. लोक या मुलीच्या डान्सचा प्रचंड आनंद घेत आहेत. आतापर्यंत सुमारे 40 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, यावरून या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. पाहू या हा व्हिडिओ…

इन्स्टाग्रामवर लोकप्रिय हा व्हिडिओ तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट geetbaggaa यावरून शेअर केला आहे. गीत कौर बग्गा असे या मुलीचे नाव आहे. या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. सोशल मीडिया यूझर्स हा व्हिडिओ इतर प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. गीत कौर बग्गा तिच्या डान्समुळे इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिचे 26 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका? पाहा हा Viral Video

VIDEO : कुत्र्यांचा असा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर होतोय Viral

मांजर आहे की कुत्रा? गोंधळलात ना? ‘हा’ Viral Video पाहा आणि ओळखून दाखवा!

Published On - 1:17 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI