AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : कुत्र्यांचा असा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर होतोय Viral

सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ (Video) पाहिले असतील, ज्यामध्ये लोक कुत्र्यांशी खेळताना दिसत आहेत. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे.

VIDEO : कुत्र्यांचा असा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, सोशल मीडियावर होतोय Viral
कुत्र्यांचा हॉलिबॉल खेळ
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jan 09, 2022 | 11:13 AM
Share

कुत्र्यां(Dogs)मध्ये सर्व प्रकारचे गुण आढळतात. ते कधी धोकादायक असतात, तर कधी अगदी मैत्रीपूर्ण… त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर ते तेवढ्याच आक्रमकतेने प्रतिहल्ला करतात आणि प्रेमाच्या बदल्यात ते प्रेमही देतात. कुत्रा हा जगातील सर्वात विश्वासू प्राणी मानला जातो आणि म्हणूनच लोक त्यांना सर्वात जास्त पाळणे पसंत करतात. खेड्यापाड्यात कमी, पण शहरांमध्ये जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला काही पाळीव कुत्रा नक्कीच दिसतील. कुत्र्यांशी खेळायला खूप मजा येते. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ (Video) पाहिले असतील, ज्यामध्ये लोक कुत्र्यांशी खेळताना दिसत आहेत. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक कुत्रे फुग्याशी खेळताना दिसत आहेत.

सामना खेळत असल्यासारखे वाटते तुम्ही लोकांना व्हॉलिबॉल खेळताना पाहिले असेल, ज्यामध्ये अनेक खेळाडू असतात आणि ते इकडे तिकडे चेंडू मारत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेच एक दृश्य पाहायला मिळत आहे, परंतु येथे कुत्रे कोणत्याही चेंडूने नाही तर फुग्याने खेळत आहेत आणि व्हॉलिबॉलपटू हातात चेंडू धरून उड्या मारत फुग्याला मारत आहेत. कुत्रे खेळत असतात ते मोठे मैदान आहे, पण तिथे माणसे दिसत नाहीत, फक्त कुत्रीच खेळताना दिसतात. अशा स्थितीत त्यांना खेळताना पाहून असे वाटते, की ते सामना खेळत आहेत.

सोशल मीडियावर शेअर हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘कुत्रे एकत्र मजा करत आहेत’ असे कॅप्शन लिहिले आहे. अवघ्या 14 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख 15 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 21 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

मजेशीर कमेंट्स व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की ‘एकत्र काम केल्याने स्वप्ने साकार होतात’, तर दुसऱ्या यूझरने ‘अल्फा डॉगने पहिल्या चार हिट्स मारल्या’ अशी कमेंट केली. त्याचप्रमाणे इतरही अनेक यूझर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

Social Mediaवर Viral झाला महागड्या मिठाईचा Video, खाण्याआधी शंभरवेळा करावा लागेल विचार

Viral Video : दुकानदारानं ग्राहकाला शिकवला असा धडा; व्हिडिओ पाहून यूझर्स म्हणाले, यमराजही करत नाहीत इतका न्याय!

मांजर आहे की कुत्रा? गोंधळलात ना? ‘हा’ Viral Video पाहा आणि ओळखून दाखवा!

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?