AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्सची जाहिरात, विक्री करताय? जन्मठेप ते 10 लाखांचा दंड, तुकाराम मुंढेंचा कठोर निर्णय

जिममध्ये जाणारे तरुण, हेल्थ सप्लिमेंट्स वापरणारे आणि सोशल मीडियावर त्यांची जाहिरात करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर आणि न्यूट्रास्युटिकल्सबाबत कठोर नियमावली जाहीर केली आहे. नियमांचे उल्लंघन, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि विनापरवाना व्यवसाय केल्यास मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe : प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्सची जाहिरात, विक्री करताय? जन्मठेप ते 10 लाखांचा दंड, तुकाराम मुंढेंचा कठोर निर्णय
tukaram mundhe latest newsImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 7:07 PM
Share

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आता प्रोटीन पावडर आहे. एफडीएच्या परवानगीशिवाय आता जीम सप्लिमेंट्सच्या उत्पादन आणि विक्रिसाठी बंदी घालण्यात आली आहे. याबद्दलची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. तरुणाईमध्ये जीम आणि बॉडी बनवण्याची क्रेझ वाझली आहे. त्याचा फायदा घेऊन काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मोठ्या प्रमाणात हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री केली जात असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे यामध्ये कोणताही वैद्यकिय सल्ला नसतो. त्यामुळे या सर्व सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात युवकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. या सर्वावर आता चाप बसवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातली नियमावली घोषित केली आहे.

प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या, वजन घटवणाऱ्या गोळ्या, क्रीडा पूरक आहार आणि हर्बल प्रोडक्ट या सर्वांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे पण यामध्ये मूळ पदार्थ हा वेगळाच असतो आणि त्याची विक्री ही वेगळ्या नावाने होते, असा धक्कादायक प्रकार अलिकडील 13 नोव्हेंबर रोजीच्या कारवाईतून समोर आला असल्याचे तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले.

त्यामुळे आता जिम, केमिस्ट आणि सोशल मीडिया क्रिएटर्सना नियमांच पालन करणं बंधनकारक असणार आहे. मुंढे यांनी स्पष्ट केलं की, नियमांचं पालन केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल.

उत्पादक, पुरवठा करणारे, वितरक, आयात करणारे, मेडिकल स्टोर्स, जिम आणि हेल्थ सेंटर्स या सर्वांना या नियमावलीला फॉलो करावे लागेल, या सर्वांकडे आता एफडीएचा परवाना असणं गरजेचं आहे. त्याशिवाय केलेली कोणतीही प्रक्रिया हे नियमाचं उल्लंघन ठरणार आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स हे सध्या सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून वजन घटवणे, चेहरा उजळवणे, ग्लो आणणे यासाठी सोप्या टीप्स देत उघडपणे खोटे दावे करतात. लहान मुलं, गर्भवती माता, रुग्ण आणि खेळाडू हे सर्व पदार्थ कोणताही विचार न करता ते सेवन करतात आणि मग आरोग्याची समस्या उद्भवते. पण आता या सर्वांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. दिशाभूल करण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई होईल, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.

गुन्हा स्वरूप आणि शिक्षा

नियमावलीचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड परवान्याविना व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेची शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय