AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय

| Updated on: Nov 20, 2026 | 1:32 PM
Share

प्रभादेवी येथील संत रोहिदास चाळीवरील रेल्वेची कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अजय चौधरी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मध्यस्थीने तात्पुरती थांबवण्यात आली आहे. स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे आणि राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय झाला. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रभादेवी येथील संत रोहिदास चाळीवरील रेल्वे प्रशासनाची प्रस्तावित कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अजय चौधरी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह इतर स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आणि चाळवासीयांच्या एकजुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला.

याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना माहिती दिली की, त्यांचे मुख्यमंत्र्यांशी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आहे. स्थानिकांची भूमिका लक्षात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कारवाईच्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलन केले. पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. बाळा नांदगावकर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी आणि आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. या चर्चेअंती कारवाई थांबवण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला मिळाल्याचे सांगण्यात आले. ही तात्पुरती स्थगिती असून, या चाळवासीयांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरत आहे.

 

 

 

Published on: Nov 20, 2026 01:32 PM

Follow Us