मांजर आहे की कुत्रा? गोंधळलात ना? ‘हा’ Viral Video पाहा आणि ओळखून दाखवा!

सोशल मीडिया (Social Media) विविध प्रकारच्या प्राण्यांच्या व्हिडिओं(Videos)नी भरलेला आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

मांजर आहे की कुत्रा? गोंधळलात ना? 'हा' Viral Video पाहा आणि ओळखून दाखवा!
मांजरीसारखा दिसणारा कुत्रा

सोशल मीडिया (Social Media) विविध प्रकारच्या प्राण्यांच्या व्हिडिओं(Videos)नी भरलेला आहे. कधी घोडा, कधी हत्ती, कधी सिंह तर कधी वाघ आदींचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. मात्र, सोशल मीडियावर ज्या प्राण्यांचे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले जातात त्यात कुत्रे आणि मांजरांचा समावेश आहे. पाळीव प्राणी असल्यानं जे त्यांना वाढवतात, पाळतात ते अनेकदा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काही ना काही व्हिडिओ शेअर करतात. अनेक व्हिडिओ खूप मजेदार आहेत, जे पाहिल्यानंतर आपल्याला हसायला येतं. तर काही व्हिडिओ असे आहेत जे विचार करायला लावतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

गोंधळून टाकणारा व्हिडिओ हा व्हिडिओ प्रत्यक्षात मांजरासारखा दिसणारा कुत्र्याचा आहे. त्याची उंचीही जास्त नाही आणि चेहऱ्याची रचनाही मांजरासारखी दिसते, त्यामुळे व्हिडिओ पाहून लोक गोंधळून जातात की मांजर आहे की कुत्रा? व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा फिकट लाल रंगाचा कुत्रा अगदी मांजरासारखा दिसतोय. त्याला पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच गोंधळून जाल.

ट्विटरवर शेअर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडलाय. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @buitengebieden_ या आयडीनं शेअर करण्यात आला आहे आणि ‘मांजर की कुत्रा?’ असं कॅप्शन लिहिलंय.

यूझर्सच्या मजेशीर कमेंट्स या मजेदार व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 14 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केलंय. त्याचबरोबर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘मैं अपना मन बदलता रहता हूं. बिल्ली?’, तर दुसर्‍या यूझरनं टिप्पणी केली की तो कुत्रा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखी अनेकांनी प्राण्याला कुत्रा असल्याचं म्हटलंय. तर काही लोकांमध्ये संभ्रम आहे की मांजर आहे की कुत्रा?

Video : वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद, पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!

…तर असे होतात स्कूटी चालवणाऱ्या मुलींचे हाल, IPS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video पाहाच!

Covid 19 ऐकलं पण Covid 30 माहीत आहे का? वाचा Kovid Kapoor यांच्या नावाची रंजक कथा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI