Covid 19 ऐकलं पण Covid 30 माहीत आहे का? वाचा Kovid Kapoor यांच्या नावाची रंजक कथा

गेल्या काही महिन्यांपासून कोविड (Covid) चर्चेत आहेच, पण यादरम्यान एका व्यक्तीचीही खूप चर्चा होतेय, ज्याचं नाव आहे कोविद कपूर (Kovid-Kapoor). त्याचं नाव कोविद ऐवजी कोविड (Covid)घेत लोक गोंधळतात. म्हणजेच व्हायरस (Virus) असा चुकीचा अर्थ घेत आहेत.

Covid 19 ऐकलं पण Covid 30 माहीत आहे का? वाचा Kovid Kapoor यांच्या नावाची रंजक कथा
कोविद कपूर

कोरोना (Corona) महामारीला जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ लोटलाय. कोविड (Covid) या नावानं ओळखल्या जाणार्‍या कोरोना महामारीनं जगभरातल्या लोकांना त्रास दिला. भारतातही पुन्हा एकदा संसर्गाची प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली आहेत. हा व्हायरस गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेच, पण यादरम्यान एका व्यक्तीचीही खूप चर्चा होतेय, ज्याचं नाव आहे कोविद कपूर (Kovid Kapoor). हा व्यक्ती Holidifyचा सह-संस्थापक आहे. त्याचं नाव कोविद ऐवजी कोविड (Covid)घेत लोक गोंधळतात. म्हणजेच व्हायरस (Virus) असा चुकीचा अर्थ घेत आहेत. यासंदर्भातील अनेक किस्से त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्विटरच्या बायोमध्ये नावाचा उल्लेख कोविद कपूर यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये लिहिलंय, की माझं नाव कोविद आहे आणि मी व्हायरस नाही’. शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. त्यात त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘माय नेम इज खान आणि मी दहशतवादी नाही’. कोविद कपूरनंही त्यांच्या नावाचं असंच विश्लेषण केलं आहे.

‘माझ्या नावानं मनोरंजन’ कोविद यांनी ट्विटरवर सांगितलंय, की त्यांचं नाव जाणून लोकांना आश्चर्य वाटतं. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, की कोविडनंतर मी पहिल्यांदा भारताबाहेर गेलो आणि माझ्या नावानं लोकांचं खूप मनोरंजन केलं. आगामी परदेशी सहली मजेशीर असतील.

Covid 30? त्यांनी एक मजेदार ट्विटदेखील शेअर केलंय, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की त्यांच्या 30व्या वाढदिवसाला त्यांच्या मित्रांनी केक ऑर्डर केला होता, ज्यावर त्यांचं नाव लिहायचं होतं. त्यांच्या मित्रांनी त्याला कोविद हे बरोबर नाव दिलं होतं, पण बेकरीवाल्याला वाटलं की ते चूक आहे आणि त्यानं त्यातलं स्पेलिंग बदललं आणि केकवर K ऐवजी C लिहिलं.

‘सर्वांना माझं नाव सांगितल्यावर हसले’ त्यांनी ट्विटद्वारे आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे आणि लिहिलंय, की स्टारबक्समध्ये, ज्या व्यक्तीनं मला कॉफी दिली त्यानं इतर सर्वांना माझं नाव सांगितलं आणि ते हसले. मी आता बहुतेकवेळा खोटी नावं वापरतो.

Viral : बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, यूझर्स भारतमातेच्या सुपुत्रास करतायत सलाम!

Viral : सोशल डिस्टन्सिंगसह खेळू शकतो का क्रिकेट? यूझरच्या प्रश्नाला दिल्ली पोलिसांचं भन्नाट उत्तर

Viral Video : नव्या दुचाकीचं केलं ‘असं’ शाही स्वागत, IPS अधिकारी म्हणाले…

Published On - 4:04 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI