Video : बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, यूझर्स करतायत सलाम!

एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय लष्करा(Indian Army)चा एक जवान बर्फाच्या वादळातही आपल्या पोस्टवरून हटत नाही आणि बर्फात गुडघे टेकून आपलं कर्तव्य बजावताना दिसतोय.

Video : बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, यूझर्स करतायत सलाम!
बर्फाच्या वादळात भारतमातेचं रक्षण करणारा जवान

थोडीशी थंडी पडली आणि पारा खाली आला, की आपण आपापल्या घरात बसतो. हिवाळ्यात थंडी जाणवू नये, म्हणून आपण दोन ब्लँकेट घेऊन झोपतो. मात्र आपले लष्करी जवान भारतमातेच्या सेवेसाठी बर्फाळ वादळात खंबीरपणे उभे असतात. एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय लष्करा(Indian Army)चा एक जवान बर्फाच्या वादळातही आपल्या पोस्टवरून हटत नाही आणि बर्फात गुडघे टेकून आपलं कर्तव्य बजावताना दिसतोय.

तुम्हाला वाटेल अभिमान आपल्या शूर सैनिकांनी आपल्या पराक्रमानं देशाची मान नेहमीच उंचावली आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या सर्व कथा आणि व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपल्या सैनिकांचा नक्कीच अभिमान वाटेल. या व्हिडिओमध्ये एक भारतीय सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत भारतमातेचं रक्षण करताना दिसत आहे.

ट्विटरवरून शेअर संरक्षण मंत्रालया(Defence Ministry)च्या उधमपूर जनसंपर्क अधिकाऱ्यानं त्यांच्या अधिकृत हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर ट्विट केला आहे. व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिलंय, की आपण आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाही, परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यागानं ते गाठू शकतो. प्रत्येकाला जगण्यासाठी एकच आयुष्य आहे, पण देशाचा प्रश्न आला तर कोण पाठीशी उभं आहे? आता हा व्हिडिओ पाहू या…

जवानाचं कौतुक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक शूर भारतीय सैनिक हातात रायफल घेऊन बर्फाच्या वादळात उभा आहे. हा सैनिक सतत उजवीकडे आणि डावीकडे पाहत आहे. एवढ्या धोकादायक वादळातही सैनिकानं आपली पोस्ट सोडली नाही. हा व्हिडिओ काश्मीर सीमेवरचा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक या जवानाचं आणि एकूणच आपल्या सैन्याचं कौतुक करत आहेत.

Viral : सोशल डिस्टन्सिंगसह खेळू शकतो का क्रिकेट? यूझरच्या प्रश्नाला दिल्ली पोलिसांचं भन्नाट उत्तर

Viral Video : नव्या दुचाकीचं केलं ‘असं’ शाही स्वागत, IPS अधिकारी म्हणाले…

Video : वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद, पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!

Published On - 2:50 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI