AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप घरापासून एक किलोमीटर राहतो लांब, आदिवासींनी सांगितला रामबाण उपाय, एकदा हे झाड लावून बघाच

साप म्हटलं की अनेकंच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो, मात्र असे काही उपाय असतात, ज्याद्वारे तुम्ही सापांना आपल्या घरात शिरण्यापासून प्रतिबंध करू शकतात, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

साप घरापासून एक किलोमीटर राहतो लांब, आदिवासींनी सांगितला रामबाण उपाय, एकदा हे झाड लावून बघाच
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 4:31 PM
Share

साप हा निसर्ग साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे, सापांमुळे उंदरांची संख्या नियंत्रणात राहून धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होते, सापाला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. जर निसर्गात सापांची संख्या कमी झाली तर दुसरीकडे उंदरांची संख्या वाढते, त्यामुळे निसर्गात असमतोल तयार होतो. त्यामुळे साप न मारण्याचा सल्ला दिला जातो. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रकारच्या प्रजाती आढळून येतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच विषारी आहेत, त्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार, आणि ज्याला आपण नाग म्हणतो तो कोबरा या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. सापांच्या अनेक प्रजाती या विषारी नसल्यामुळे त्या मानवास फार घातक नसतात. मात्र साप कोणताही असो त्याला पूर्ण माहितीशिवाय थेट पकडू नये, किंवा त्याला मारू नये, त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, सर्पमित्र या सापांना निसर्गात मुक्त करतात.

भारतामध्ये आढळणारे अनेक साप हे विषारी नाहीत ही गोष्ट जरी खरी असली तर देखील साप घरात दिसताच भीती वाटते. एवढंच नाही तर अनेकदा विषारी साप देखील घरात शिरू शकतो. घोणस प्रजातीचा जो साप आहे, हा साप अत्यंत विषारी आहे, आणि याची प्रजनन क्षमता चांगली असल्यामुळे सध्या या जातीच्या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा साप अनेकदा घरांमध्ये आढळून येते, हा साप प्रचंड विषारी असल्यामुळे या सापाच्या दंशामुळे व्यक्ती दगावण्याची देखील शक्यता असते, हा साप प्रचंड आक्रमक असतो. त्याच प्रमाणे अनेकदा घोणस सोबतच नाग आणि मण्यार जातीचे विषारी साप देखील घराच्या आसपास किंवा घरात आढळून येतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये योग्य काळजी घेणं हाच एकमेव त्यावर उपाय आहे.

मात्र अशी देखील काही झाडं असतात ज्याचा वास हा सापांना सहन होत नाही, ज्या घरात किंवा घराच्या परिसरात ही झाडं असतात त्या घरात साप कधीही प्रवेश करत नाही, अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या वासामुळे साप घरातच काय त्या परिसरात सुद्धा प्रवेश करत नाही. झारखंडमध्ये दुर्गम भागात राहणारे आदिवासी हे झाड कायम आपल्या घराच्या समोर किंवा आजूबाजूला लावतात. घोडबंच असं या झाडाचं नाव आहे. हा जंगलाचा भाग आहे, इथे साप दिसणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र जर तुमच्या घरासमोर घोडबंच लावलेलं असेल तर साप घरात प्रवेश करत नाही, असा दावा येथील लोकांनी एका वेबसाईटशी बोलताना केला आहे, त्यामुळे सापांना घरापासून दूर ठेवण्यास या झाडाची तुम्हाला मदत होऊ शकते.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार