AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: सस्पेन्स अन् थ्रिलचा डबल डोस; घरबसल्या अनुभवा विजय गायतोंडेची नवी खेळी, ‘दृश्यम 3’ ची ओटीटी रिलीज डेट समोर

Drishyam 3 OTT Release Date Netflix: अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम 3' सिनेमाची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे. अखेर ज्यांनी सिनेमा पाहिला नाही, त्यांना सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस घरबसल्या अनुभवता येणार आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Drishyam 3: सस्पेन्स अन् थ्रिलचा डबल डोस; घरबसल्या अनुभवा विजय गायतोंडेची नवी खेळी, 'दृश्यम 3' ची ओटीटी रिलीज डेट समोर
| Updated on: Nov 22, 2026 | 12:57 PM
Share

Drishyam 3 OTT Release Date Netflix: अभिनेता अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 3’ सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मोठ्या पडद्यावर बक्कळ कमाई केल्यानंतर आता प्रेक्षकांना घरबसल्या सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमेच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, बॉक्स ऑफिसवर सिनेमाने बक्कळ कमाई केली, प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे, ज्यांनी सिनेमा पाहिला नाही, त्यांना घरबसल्या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. असं सांगण्यात येत आहे की, नेटफ्लिक्सवर ‘दृश्यम 3’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘दृश्यम’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘दृश्यम 3’

मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात येत आहे की, ‘दृश्यम 3’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो. अजय देवगण स्टारर सिनेमा 27 नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पण नेटफ्लिक्सच्या आगामी सिनेमाच्या यादीत अद्याप ‘दृश्यम 3’ सिनेमाचं देखील नाव असल्याचं दिसत नाही. मात्र, अद्याप ‘दृश्यम 3’ च्या निर्मात्यांनी सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे, प्रेक्षकांना अंतिम अपडेटसाठी नेटफ्लिक्सच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.

‘दृश्यम 3’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘दृश्यम 3’ ने जगभरात 589.26 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. या सिनेमाने भारतात 380.95 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन आणि परदेशात 133.20 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केलं आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली असून या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये आपले स्थान पक्क केलं आहे.

दृश्यम 4 प्रदर्शित होणार का?

अजय देवगण याने यापूर्वीच असे संकेत दिले आहेत की, ‘दृश्यम 3’ सोबत या क्राईम थ्रिलर फ्रँचायझीची कथा पूर्ण झाली आहे. मात्र, भविष्यात याचा पुढचा भाग बनणार की नाही, यावर निर्मात्यांनी कोणतेही ठोस भाष्य केलेलं नाही. अभिनेत्याच्या मते, पुढे काय होतं हे तर काळच ठरवेल. सध्या अजय देवगणच्या चाहत्यांचं लक्ष सिनेमाच्या ओटीटी रिलीजकडे लागलं आहे. जर हा सिनेमा 27 नोव्हेंबरला रिलीज झाला, तर चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल.

Follow Us
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात