मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. धनगर समाजाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती. आठ महिन्यांपूर्वीच ते राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चालताना त्रास जाणवल्याने ते स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. रामराव वडकुते हे धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच त्यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली होती. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात त्यांचे मोठे कार्य होते. माजी आमदार म्हणूनही त्यांची ओळख होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. 2009 मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वडकुते यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. सात वर्षांनंतर रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली होती.
Published on: Nov 22, 2026 10:57 AM
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...

