AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ

मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ

| Updated on: Nov 22, 2026 | 10:09 AM
Share

मुंबईत थंडीचा कडाका वाढला असून, गेल्या 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात कमी 16.2°C तापमानाची नोंद सांताक्रुझ वेधशाळेने केली आहे. एका बाजूला गारठा वाढत असताना, दुसऱ्या बाजूला शहरातील हवेच्या गुणवत्तेत घट होऊन प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमानात चढ-उतार अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. शहरात गेल्या 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाबा वेधशाळेने सरासरी 21.8°C तापमानाची नोंद केली असली तरी, सांताक्रुझ वेधशाळेत 16.2°C तापमानाची नोंद झाली, जी या महिन्यातील सर्वात कमी आहे. 11 वर्षांपूर्वी 19 नोव्हेंबर रोजी अशाच पद्धतीने 16.2°C तापमानाची नोंद झाली होती. गेल्या काही काळापासून अल निनोच्या प्रभावामुळे ऑक्टोबर हीट जाणवत होती, मात्र आता नोव्हेंबर महिन्यात सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी तापमान खाली आले आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमानात चढ-उतार अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. एका बाजूला थंडी वाढत असताना, दुसरीकडे मुंबईतील प्रदूषणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपाययोजना केल्या जात असल्या, तरी सकाळी धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 170 च्या वर, तर काही भागात 200 च्याही वर गेला आहे, ज्यामुळे थंडीसोबत प्रदूषणाची चिंता वाढली आहे.

Published on: Nov 22, 2026 10:09 AM

Follow Us