AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: खासदाराचा दर 150 कोटी… संजय राऊतांच्या आरोपावर शिंदे सेनेतून पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी नुकताच येत्या हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा मिळावा यासाठी खासदारांना 150 कोटी रुपयांचा भाव ठरल्याचा दावा केला. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut: खासदाराचा दर 150 कोटी... संजय राऊतांच्या आरोपावर शिंदे सेनेतून पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde and Sanjay rautImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 12:55 PM
Share

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदरा संजय राऊत यांनी नुकताच येत्या हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा मिळावा यासाठी खासदारांचा 150 कोटी रुपयांचा भाव ठरला असल्याचा दावा केला. या दाव्यावर आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी खणखणीत उत्तर दिले आहेत.

संजय शिरसाट यांनी संभाजीनगर येथे एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. ‘संजय राऊत काहीही बोलतात, ते निवडणूक आयोगाला कोट्यवधी रुपये घेतले म्हणतात, ते न्याय व्यवस्थेवर बोलतात. तुमच्या खासदारांनी तुमच्या कानात सांगितले असेल. हेडलाइन म्हणून खासदारांवर आरोप करणे म्हणजे हे लोकशाहीला मारक आहे. आमच्या वेळी 50 खोके एकदम ओके असे म्हणाले आता काय झाले? मोदी जातील असे ते म्हणाले. आधी आमच्या वेळी ही आमचे सरकार जाणार असे म्हणाले. बिल येणार हे राऊतला माहित आहे हे माहित आहे’ असे संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांनी खासदार रामराव वडकुते यांना देखील श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, ‘आमचे सहकारी राज्यसभा खासदार रामराव यांचे हृदयविकाराने निधन झाले,त्यांनी चळवळीत काम केले होते,महाराष्ट्राचे नुकसान झाले त्यांचा दांडगा संपर्क होता.’

टिपू सुलतान जयंतीला भाजप नगरसेवकाची उपस्थिती पाहून ते म्हणाले, ‘टिपू सुलताना बद्दल प्रेम का उफाळून येत कळायला मार्ग नाही, ओवेसीने प्रेम दाखवणे धार्मिक लढा असून त्याला मात्र मते घ्यायाचे आहे.भाजप चे नगरसेवक लोक सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.’

पुढे ते म्हणाले की, आमचा ऍक्शन प्लान तयार आहे.आम्ही लोकांना मदत देतोय,सायकल,मशीन ,शिधा आम्ही देतोय आता आम्ही रक्तदान मोहीम घेत आहोत. विरोधी पक्षाचा आम्ही शेतकऱ्यांनाच पाठीशी उभा आहे असा दाखवण्याचा प्रयत्न. त्यांना (आदित्य ठाकरे) प्रशासन माहीत नसल्याने बालिश वक्तव्य करत आहेत. दुष्काळाची तीव्रता डिसेंबर मध्ये जास्त असतील त्यासाठी उपायोजना करत आहेत.

Follow Us
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात