AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Popular Discontinued Cars: मोठी मागणी असूनही ‘या’ कंपनीने बंद केल्या कार मॉडेल्स! कारण…

Popular Discontinued Cars: भारतीय बाजारपेठेत अशा अनेक कार्स होत्या ज्या ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या, तरीही कंपन्यांनी त्या बंद करण्याचा निर्णय घेतला. या कार्स कोणत्या आहेत आणि त्या बंद करण्यामागची खरी कारणे काय होती, हे जाणून घ्या.

Popular Discontinued Cars: मोठी मागणी असूनही 'या' कंपनीने बंद केल्या कार मॉडेल्स! कारण...
why popular cars discontinued
| Updated on: Nov 22, 2026 | 12:33 PM
Share

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत अशा अनेक कार आहेत ज्यांनी ग्राहकांची मने जिंकली आहेत. अजूनही त्यांची मागणी आहे. आजही सेकंड-हँड कार मार्केटमध्ये अशा कार्सची मोठी मागणी आहे. मारुती सुझुकी ओम्नी, मारुती जिप्सी, अल्टो ८००, फोर्ड इकोस्पोर्ट, फोर्ड एंडेव्हर, ह्युंदाई सँट्रो आणि रेनॉ डस्टर यांसारख्या वाहनांची लोकप्रियता सगळ्यांचं माहित आहे. अनेकांना या गाड्या प्रचंड आवडतात. पण तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की जर या गाड्यांची एवढी डिमांड होती मग या गाड्या कंपनीने अचानक का बंद केल्या? तर यामागचे अनेक कारणं आहेत. ज्यामध्ये कडक सरकारी नियम, बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि कंपन्यांची स्वतःची व्यावसायिक धोरणे यांचा समावेश आहे.

कडक प्रदूषण नियम बनला मोठा अडथळा

उत्तम विक्री आणि लोकप्रियता असूनही अनेक चांगल्या गाड्या बंद होण्यामागे कारण सरकारकडून लागू झालेला कडक प्रदूषण नियम आहे. विशेषतः BS6 आणि BS6 फेज-2 मानक आहेत. 2020 मध्ये BS6 नियमावली लागू झाल्यानंतर आणि एप्रिल 2023 मध्ये रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स नियम अंमलात आल्यानंतर, वाहन उत्पादकांसाठी त्यांची विद्यमान इंजिने आणि एक्झॉस्ट प्रणाली पूर्णपणे अद्ययावत करणे अनिवार्य झाले.

गाड्यांचे मॉडेल सुधारण्यासाठी मोठा खर्च

मारुती अल्टो ८००, रेनॉ डस्टर आणि अनेक डिझेल कारला मॉडेल सुधारण्यासाठी मोठा खर्च आला असता. त्याला मोठा अभियांत्रिकी आणि संशोधन खर्च आला असता. यामुळे या वाहनांच्या किमतीत मोठी वाढ झाली असती, म्हणून कंपन्यांनी ही मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला.

नवीन सुरक्षा आणि क्रॅश चाचणी अपयशी

प्रवाशांच्या सुरक्षेच्या हितासाठी, भारत सरकारने ‘भारत नवीन वाहन सुरक्षा मूल्यांकन कार्यक्रमा’अंतर्गत, अनिवार्य क्रॅश चाचणीसोबतच एअरबॅग, एबीएस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारख्या वैशिष्ट्यांची आवश्यकता असलेले कठोर नियम लागू केले. यामध्येही या गाड्यांनी उत्तम परफॉमन्स केला नाही. या वाहनांना आधुनिक क्रॅश चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या संरचनेत बदल करणे हे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरले. याच कारणामुळे, जोरदार मागणी असूनही, सुरक्षा नियमांमुळे या वाहनांचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करावे लागले.

Follow Us
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात