AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajendra Bhinge: राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शन…

Rajendra Bhinge News: पंढरपूर शहर मध्ये 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्र भिंगे यांची गोळ्या झाडून संपवण्यात आले होते. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला असून याची पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले

Rajendra Bhinge: राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शन...
| Updated on: Nov 22, 2026 | 12:24 PM
Share

Rajendra Bhinge Case: पंढरपूर शहर मध्ये 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्र भिंगे यांची गोळ्या झाडून संपवण्यात आले होते. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला असून याची पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे. पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांची 2017 मध्ये  संपवण्यात आले होते. या प्रकरणात राजेंद्र भिंगे हा मुख्य आरोपी होता. याची नुकतीच निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भोईटे यांच्या हत्येच्या बदल्यासाठी राजेंद्र भिंगे यांचा खून करण्यात आला असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

या प्रकरणांमध्ये पुणे येथून नागे नावाचा शूटर बोलविण्यात आला होता. हा शूटर काही दिवस पंढरपूर मध्ये राहून त्याने भिंगे यांची रेकी केली होती. यातूनच जेवणानंतर भिंगे हे एकटेच शतपावली साठी बाहेर पडतात हे पाहून दुचाकी वर येऊन भिंगे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या हलेखोरांकडून पुण्यात वापरलेले पिस्टल ही जप्त केले आहे. यामध्ये एक आरोपी 24 तासाच्या पंढरपुरात पकडण्यात आला. प्रतीन आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पकडले होते. त्यांचा तपास करताना उरलेले आरोपी गुजरातमार्गे राजस्थानकडे पळून जाणार असल्याची माहिती तपासात समोर आली. यानंतर पोलिसांनी विविध पथके पाठवून गुजरातच्या सोमनाथ येथून या तीन आरोपींना अटक केली. सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून यामागे कोणी सूत्रधार आहे का? याचा तपास केला जात असल्याचे पोलिस अधीक्षकातून कुलकर्णी यांनी बोलून दाखवले आहे.

बारा तासाच्या आत पोलिसांनी एकापाठोपाठ एक आरोपी पकडण्यास सुरुवात केलेली. शेवटचे आरोपीला काल गुजरात येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात प्रथम प्रवीण उर्फ तात्या शिंदे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) यांना अटक केली होती. 

Follow Us
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात