AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार रामराव वडकुते यांच्या जाण्याने भाजपची हानी; विनोद तावडे भावुक, म्हणाले महाराष्ट्र सदनात एक डॉक्टर…

खासदार रामराव वडकुते यांच्या जाण्याने भाजपची हानी झाली, असं म्हणत विनोद तावडे भावुक झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदनात एक डॉक्टरची शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार रामराव वडकुते यांच्या जाण्याने भाजपची हानी; विनोद तावडे भावुक, म्हणाले महाराष्ट्र सदनात एक डॉक्टर...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 12:06 PM
Share

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं रविवारी निधन झालं. वडकुते यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. रामराव वडकुते यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनानंतर विनोद तावडे यांनी त्यांच्या कुटुंबीयाची भेट घेतली. वडकुते यांच्या जाण्याने खासदार विनोद तावडे देखील भावुक झाले. त्यांनी वडकुते यांच्या जुन्या आठवणींना सांगितल्या.  तसेच महाराष्ट्र सदनात एक डॉक्टर शिफारस करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विनोद तावडे यांनी घेतली दिवंगत राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. विनोद तावडे म्हणाले, आम्ही एकत्र राज्यभेत गेलो होतो.  समाजातील अनेक विषयांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.  रामरावांसारखे सक्रिय राजकारणी जाणं पक्षासाठी हानी आहे. महाराष्ट्र सदन, हरियाणा भवन, पंजाब अशा तिन्ही सदनांना मिळून तीन शिफ्टमध्ये एक डॉक्टर ठेवायची शिफारस करणार आहे. मी त्यासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहे’.

तावडे पुढे म्हणाले, ‘रामराव वडकुते हे विधानपरिषदेत असल्यापासून आमची मैत्री होती. विरोधी बाकावर होते, तरी आमची मैत्री होती. त्यांचं धनगर समाजाच्या विकासासाठी काय करता येईल, यासाठी ते सक्रिय होते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. रविंद्र चव्हाण असतील किंवा केंद्रीय नेतृत्व असेल त्यांना राज्यसभेवर येण्याची संधी दिली.  राज्यसभेवर आल्यावर त्यांनी समाजाच्या विषयी आवाज ही उठवला.  रामराव सारखा सक्रिय कार्यकर्ता जाणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची हानी आहे. खरंतर महाराष्ट्र सदनातील डॉक्टर पोस्ट रिक्त आहे.  जेव्हा त्यांना ताबडतोब बरं वाटलं नाही. तेव्हा त्यांना ताबडतोब एम्समध्ये नेण्यात आलं होतं. त्यांना तिथं ताबडतोब उपचार मिळाले. पण हे खरं आहे की या सदनांमध्ये बाकी सुद्धा नागरिक बाकी राज्यामधून येत असतात. त्यांना अशी एखादी सुविधा महाराष्ट्र सदन असेल. हरियाणा भवन असेल, पलिकडे पंजाब आहे. तीन चार भवनांमध्ये बाय रोटेशन तीन शिफ्टमध्ये नक्की ठेवता येईल. आणि त्यासाठी मी आग्रह धरेल’.

Follow Us
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद